क्रीडा व मनोरंजन

संदीप दिवे – केशर निर्गुण अंतिम विजेते शिवशाही चषक राज्यस्तरीय कॅरम

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

रत्नागिरी जिल्हा कॅरम संघटनेच्या वतीने व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने माननीय नामदार उदयजी सामंत,महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी पुरस्कृत केलेल्या शिवशाही चषक राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या अंतिम फेरीत मुंबई उपनगरच्या संदीप दिवेने पुण्याच्या सागर वाघमारेचा तीन सेटमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत २५-१४, १०-१८ व १५-५ असा पराभव करत शिवशाही चषकावर आपले नाव कोरले. तर महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात पहिल्यांदाच अंतिम प्रवेश केलेल्या सिंधुदुर्गच्या केशर निर्गुणने रत्नागिरीच्या आकांक्षा कदमला २५-३, २५-१४ असे सहज पराभूत करून सर्वानाच आश्यर्याचा धक्का दिला. अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी पुरुष एकेरी गटातील उपांत्य सामन्यात संदीप दिवेने मुंबई उपनगरच्या महम्मद यासिन शेखला ९-२५,२५-१० व १९-१७ असे पराभूत केले होते दुसरीकडे पुण्याच्या सागर वाघमारेने रत्नागिरीच्या रियाझ अकबर अलीला २३-२, २५-१९ असे पराभूत केले होते. तर महिला एकेरी गटाच्या तिसऱ्या उपांत्य लढतीत केशर निर्गुणने रत्नागिरीच्या मैत्रेयी गोगटेला १५-१८, १८-१२ व २५-११ असे नमविले होते. दुसऱ्या सामन्यात आकांक्षा कदमने पालघरच्या श्रुती सोनावनेला २५-०, १२-२० व २५-८ असे हरविले होते.
आदरणीय खासदार विनायकजी राऊत व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदयजी सामंत यांच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. याप्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष श्री जितेंद्र शहा, उपाध्यक्ष श्री अरुण केदार व श्री शांताराम गोसावी तसेच रत्नागिरी जिल्हा कॅरम संघटनेचे अध्यक्ष श्री प्रदीप भाटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!