ताज्या घडामोडी

पावसच्या स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर तर्फे स्वच्छता मोहीम

Spread the love

पावस:– रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी केली मंदिर रोडची स्वच्छता दरवर्षीप्रमाणे स्वामी स्वरूपानंदांचा जन्मोत्सव सोहळा डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये सुरू होतो या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील भावीक समाधी मंदिराला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात सांगली कोल्हापूर रत्नागिरी या ठिकाणाहून दिंडी पताका पायी सुद्धा येत असतात भाविकांना बिनधास्तपणे फिरता यावे या उद्देशाने स्वामी मंदिर रोडची स्वच्छता करून आजूबाजूला असणारे प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिक बॉटल्स एकत्र करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावली प्रत्येक वर्षी विद्यामंदिरचे विद्यार्थी व शिक्षक स्वामी स्वरूपानंदांच्या सेवेसाठी उपस्थित असतात यावेळी स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर चे महाराष्ट्र छात्र सेनेचे विद्यार्थी तसेच स्काऊट गाईडचे विद्यार्थी शिक्षक सुदाम चौरे पर्यवेक्षक श्री व्ही बी काटे मुख्याध्यापक श्री बी.बी. माने आणि ग्रामस्थ नाना गांगण आधी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!