ताज्या घडामोडी

३३ वर्षीय तरुणांची हत्या, पैशाच्या देवाण-घेवाणवरून हत्या झाल्याच प्राथमिक अंदाज..!

Spread the love

फिर्यादीच निघाला आरोपी, हत्या केल्याची दिली कबुली

मुरूम पोलिसात गुन्हा दाखल

मुरूम, ता. उमरगा, ता. २३ (प्रतिनिधी) : उस्मानाबाद येथील राहणारे सिद्धेश्वर व्यंकट मजगे, वय ३३ हे १३ जून पासून बेपत्ता असल्याची तक्रार आनंद नगर पोलीस चौकीत करण्यात आले होती. सदरील बेपत्ता इसमाचा मुरूम पोलीस स्टेशन हद्दीत हत्या होऊन त्याला शेतात पुरण्यात आले असल्याची घटना ता.२२ रोजी उघडकीस आली. सविस्तर वृत्त असे की, उस्मानाबाद येथील सांजा बायपास रोड हद्दीत राहणारे सिद्धेश्वर व्यंकट मजगे ता.१३ जून पासून बेपत्ता असल्याची मयत व्यक्तीचा भाऊ विरभद्र व्यंकट मजगे यांनी आपले वडील व्यंकट बाळप्पा मजगे यांना सोबत घेऊन आनंद नगर पोलीस चौकीत फिर्याद दिली होती. फिर्यादीवरून आनंद नगर पोलीस चौकीत मुलगा बेपत्ता असल्याचे तक्रार दाखल झाली होती. (ता. २१) रोजी आनंद नगर येथील चौकीला जाऊन फिर्यादी विरभद्र मजगे यांनी माझ्या भावाला आळंगा (कर्नाटक) येथील नातेवाईकांनी मारून त्याला मी बटईने केलेल्या शेतात पुरले असल्याची कथित माहिती त्यांनी पोलिसांना दिली. ता.२२ जून रोजी विरभद्र यांनी मुरूम पोलीस स्टेशन गाठले व आनंद नगर पोलिसांना सांगितलेली कथित माहिती मुरूम पोलीस स्टेशनला सांगितली. मुरुम पोलिसांनी सदरील प्रकरणाचा शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी संबधित विभागाचे अधिकारी महसूल, आरोग्य विभाग, नगर परिषद कर्मचारी आदींच्या उपस्थितीत घटनास्थळी गेले. विरभद्र यांनी दाखवलेल्या जागेची शहानिशा करून उकरले असता सदरील ठिकाणी एक पुरुष जातीचा प्रेत निदर्शनास आले. त्यानंतर मयताच्या अंगावरील कपडे, खान-खून, गळ्यातील रुद्राक्ष इत्यादी खुनाच्या आदारे सदरील प्रेत हे बेपत्ता सिद्धेश्वर व्यंकट मजगे यांचे असल्याची ग्वाही मयताची पत्नी आशा, भाऊ विरभद्र नातेवाईक यांनी सांगितले. आरोपी सकाळ पासून वेगवेगळी कथित माहिती देऊन पोलिसांना बुचकाळ्यात टाकण्याचा प्रयत्न करीत होता. मयत व्यक्तीला पुरल्याची जागा स्वतः विरभद्र यांनी दाखविला होती. पोलिसांना फिर्यादी विरभद्र व्यंकट मजगे यांच्यावर संसय येत होता. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन विचारले असता सदरील खून मीच केला असल्याची कबुली विरभद्र मजगे यांनी दिली. तसेच या खुनात नरेश भालचंद्र हंबीरे, रा.मुरूम, ता.उमरगा यांनीही सहकार्य केले असल्याचे विरभद्र यांनी आपल्या कबुलीत म्हटले आहे. मयत व्यक्तीच्या पत्नी आशा सिद्धेश्वर मजगे यांच्या मुरूम पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून ता.१३ जून रोजीच्या रात्रीच्या ९ नंतर व २२ जून रोजीचे दुपारी ४ वाजताच्या दरम्यान या कालावधीत माझा नवरा सिद्धेश्वर व्यंकट मजगे यास पैसे देणे-घेण्याच्या कारणावरून व आम्ही राहत असलेल्या उस्मानाबाद येथील रक्कम रुपये २५ लाखाचा प्लॉट हडप करण्याच्या उद्देशाने माझा नवरा सिद्धेश्वर यास माझा दीर विरभद्र व्यंकट मजगे व पैसे देणार सावकार नामे नरेश भालचंद्र हंबीरे दोघे रा. मुरूम यांनी माझ्या नवऱ्यास मुरूम येथे बोलावून घेऊन त्यास दिराने बटईने केलेल्या अक्कलकोट रोड वरील दिपक सुर्यकांत प्रचंडे यांच्या शेतात जेवण करण्याकरिता नेऊन त्यास ठार मारून त्यास शेतात पुरून टाकले आहे. तरी माझ्या नवऱ्यास ठार मारणारे व प्रेत पुरणारे विरभद्र व्यंकट मजगे व नरेश भालचंद्र हंबीरे दोघे राहणार मुरूम यांच्या विरुद्ध तक्रार असल्याची फिर्यादीने म्हटले आहे. आशा सिद्धेश्वर मजगे यांच्या फिर्यादीवरून कलम ३०२, २०१, ३४ भादवि प्रमाणे मुरूम पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी उस्मानाबाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश बरकते आदींनी भेट देऊन पुढील कारवाईस मुरूम पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगनाथ जगताप यांना मार्गदर्शन केले. पुढील तपास सपोनि जगताप करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!