आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

प्रथमच मावळ तालुक्यामध्ये माहिती अधिकाराचे प्रशिक्षण व मार्गदर्शन…

मावळ तालुका येथील यज्ञ कोचिंग क्लासेस तसेच नापासांची शाळा येथे आज दिनांक ६/१/२०२३रोजी प्रथमच मावळ तालुक्यामध्ये माहिती अधिकाराचे प्रशिक्षण देण्यात आले व मार्गदर्शन करण्यात आले.

Spread the love

मावळ तालुका येथील यज्ञ कोचिंग क्लासेस तसेच नापासांची शाळा येथे आज दिनांक ६/१/२०२३रोजी प्रथमच मावळ तालुक्यामध्ये माहिती अधिकाराचे प्रशिक्षण देण्यात आले व मार्गदर्शन करण्यात आले.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, ६ जानेवारी. 

माहिती अधिकार अधिनियम २००५ अधिकार कसा भरावा व कोठे भरावा व कशा पद्धतीने भरावा याचे मार्गदर्शन देण्यात आले यावेळेस या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे उपस्थित मध्ये संपादक विवेकजी इनामदार तसेच तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुन्हे. नितीन लांडगे साहेब व जनसेवा विकास समिती संस्थापक अध्यक्ष. किशोर भाऊ आवारे यावेळी उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना माहिती अधिकार कार्यकर्ता श्री प्रदीप नाईक यांनी यज्ञ कोचिंग क्लासेस से तसेच नापास यांच्या शाळेचे अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले माहिती अधिकार कसा भरावा कुठे भरावा कसा करावा व माहिती अधिकार कायद्याचे महत्त्व सांगून दिले अनेक विद्यार्थ्यांनी या माहिती अधिकार प्रशिक्षणाचा व मार्गदर्शनाचा खूप लाभ घेतला आहे व त्यांना या कायद्याविषयी जाणून घेण्यासाठी खूप उत्सुकता दिसून आली व माहिती अधिकार कायद्यानुसार आपण भ्रष्टाचाराला कसा आळा घालू शकतो हे  प्रदीप नाईक यांनी या मार्गदर्शना शिबिरामध्ये मार्गदर्शन केले.

तसेच प्रथमच मावळ तालुक्यामध्ये असे काही उपक्रम पहिल्यांदाच राबवण्यात आला आहे कायद्याविषयी सर्वसामान्य जनतेला तसेच विद्यार्थ्यांना माहिती असावी हे श्री प्रदीप नाईक यांनी सांगितले व असे अनेक मार्गदर्शन शिबिर मी घेणार आहे व या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला कायद्याची ताकद दाखवून देणार आहे असे सुद्धा, प्रदीप नाईक यांनी सांगितले त्यावेळेस विवेकजी इनामदार संपादक एमपीसी न्यूज यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शैक्षणिक रित्या आपण कसे पुढे जावे व शिक्षण घेऊन एक चांगल्या पद्धतीने आपण एक सुज्ञ नागरिक व्हावे असे सुद्धा त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळेस  नितीन लांडगे साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व आपण कुठल्याही भाईंना आदर्श न ठेवता कायद्याचा आदर्श ठेवा व आपण कसे आदर्श नागरिक व आदर्श विद्यार्थी बनून हे त्यांनी यावेळेस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित यज्ञ कोचिंग क्लासेस चे संस्थापक तसेच नापासांची शाळेचे संस्थापक  नितीन फाकटकर सर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून उत्साह निर्माण केला तसेच ज्यावेळेस यज्ञ कोचिंग क्लासेस तर्फे मोहम्मद जमादार,कृपा काशीद,हरीश चौधरी, हर्ष पारेख इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते.

आणि संस्थेच्या स्नेहा पवार, अश्विनी ढेरंगे, अर्चना गोरे, दिपाली जांभुळकर, इत्यादी शिक्षकवर्ग उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!