ताज्या घडामोडी

धनगर बांधवांनो समाज परीवर्तनाचे शिलेदार व्हा.!

Spread the love

आदरणीय धनगर समाज बांधवांनो,आजपर्यंत समाजातील अनेक बांधवांनी समाज जागृतीचा वसा घेतला व तळागाळातील समाज बांधवांना नरक यातनांतून बाहेर काढण्यासाठी अनेक झपाटलेल्या लोकांनी प्रयत्न केले.पण आजही धनगर समाजाच्या नरक यातना संपलेल्या नाहीत म्हणून धनगर समाज प्रस्थापिता बरोबर पुढे जाऊ शकला नाही.आजही धनगर समाज सामाजिक,शैक्षणिक,आर्थीक,राजकिय दृष्ट्या अतिशय मागासलेला आहे.धनगरांची संख्या राज्यात क्रमांक दोनवर असून सुध्दा इतर समाजावर या समाजाचे सामाजिक वर्चस्व नाही.राज्यात आणि देशात कोणीही धनगर माणूस श्रीमंतांच्या पहिल्या शंभरांच्या यादीत नाही. शैक्षणिकदृष्ट्या राज्यात आणि देशात कोणीही धनगर माणूस अग्रस्थानी शोधून सापडत नाही.केंद्रीय प्रथम श्रेणीच्या अधिकार्यांच्या यादीत धनगर अधिकार्यांची संख्या दोन अंकीच्या वर सापडत नाही तर राज्याच्या प्रथम श्रेणी अधिकार्यांची संख्या तीन अंकीच्या वर गेली नाही.राजकारणात आमचे आमदार खासदार कधी दोन अंकी संख्या गाठू शकले नाहीत.हे आमचं वास्तव चित्र आहे.आमची अनुसुचित जमातीत नोंद आहे पण गेल्या ७५ वर्षात आम्हाला अनुसुचित जमातीच्या सवलतीच या राज्यकर्त्यांनी आम्हाला आजपर्यंत मिळू दिल्या नाहीत.त्या मिळवून देण्यासाठी व समाजाच्या उत्थानासाठी समाजातील अनेक मान्यवरांनी प्रयत्न केलेत पण त्यांनाही समाजिक विघटनामुळे यश मिळू शकले नाही.काही मान्यवरांनी समाजाला समजावून पाहीले पण समाज एकत्र यायला तयार नाही,ऐकायला तयार नाही म्हणून ऐकेल त्याला सोबत घेवून कोणत्या ना कोणत्या राजकिय पक्षाचा झेंडा हातात घेवून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधून घेतला.त्यामुळे आजही समाज मागासलेल्या आवस्थेतच आहे.तरीही आम्ही ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून नि:स्वार्थपणे समाज जागृतीसाठी झटत राहीले त्यात प्राधान्याने बॅ. आमदार टी.के शेंडगे व आदरणीय बी.के.कोकरेंचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.बॅ.शेडगेंनी झोपलेल्या समाजाला दिशा दिली आणि बी.के.कोकरे साहेबांनी अहोरात्र मोटरसायकलीवर फिरून संपूर्ण समाजाला जागे करून चेतना निर्माण केली.आदरणीय बी.के.कोकरे साहेबांमुळेच महाराष्ट्रातील धनगर समाजाला किमान एन.टी.क चे आरक्षण मिळाले.त्यामुळे कुठेतरी समाजात शैक्षणिक,राजकिय जागृती झाली.पण समाजातील नेत्यांच्या पक्षीय राजकारणामुळे समाज पुन्हा विखुरला गेला.त्या समाजासाठी सर्वश्वाचा त्याग करणार्या मा.बी.के.कोकरेंनाही हा समाज नंतरच्या काळात विसरला.समाजातील लोक स्वाभिमान विसरून कोणाच्याही मागे जावू लागले,कोणत्याही झेंड्याखाली क्षणिक स्वार्थासाठी धावू लागले.त्यातच घात झाला,राजकिय पक्षांनी डाव साधला.धनगर समाज एकत्र येवू नये असे डाव खेळले गेले. समाज दिशाहिन झाला.त्यामुळे बी.के.कोकरेंमुळे जागा झालेला समाज मा.बी.के.कोकरे साहेबांच्या त्यागालाही विसरला व राजकिय वातावरणात भरकटत राहीला.ही आवस्था २०१४ पर्यंत सुरूच होती.त्याच सुमारास सोशल मिडीयाचे प्रस्थ वाढले.व्हाट्सएप व फेसबुकच्या माध्यमातून समाज पुन्हा एकत्र येवू लागला.समाजातील बुध्दीजीवी वर्ग दररोज समाज जागृतीसाठी लेख लिहू लागले लोक आवडीने वाचून प्रतिक्रिया देवू लागले व चर्चा करू लागले.या लेखामध्ये जेष्ठ लेखक बापुसाहेब हटकर,शिवाजीराव ठोंबरे,प्रा.विष्णू कावळे,प्रा.यशपाल भिंगे,एम.जी.बोरकर,निवांत कोळेकर,सुभाष मासुळे,रामभाऊ लांडे,लक्ष्मण नजन,अशोक पातोंड,अभिमन्यू टकले,डॉ.चिंतामण पाटील,चंद्रशेखर सोनवणे,डॉ.जे.पी.बघेल,मा.मधूजी शिंदे साहेब,तुळशीराम आचणे,विजय काळे,श्रीधर गोरे,श्रीकांत बरींगे,अविनाश धायगुडे,सागर मदने,महेश पिंगळे, कवि.राजीव हाके,डॉ.गजानन हुले,शारदाताई ढोमणे,विक्रम ढोणे,शरणू हंडे,संतोष मळगे,शेखर भंगाळे,अमोल पांढरे,विजय शिरसाठ,धनंजय तानले,सुमित लोखंडे,नवनाथ ढगे,धनश्री आजगे,दिगंबर खटके,रामचंद्र आडते,शेखर बोरसे,गोविंद सुरनर,नितीन पाटील,कवी भिमराव गढरी,विनोद खेमनर,मनोज कोळेकर,गजानन कोकरे यासारखे शेकडो लेखक, कवी,व्याख्याते,अभ्यासक यांचे दर आठवड्याला लेख,सामाजिक पोस्ट,व्याख्याने फेसबुक, व्हाट्सएप युट्यूबवर झळकू लागले ,समाजातील गृप्सवर चर्चा झडू लागल्या व समाज प्रबोधन होवून समाजात चांगली जागृती होवू लागली.समाजातील विविध संघटना दररोज काही ना काही उपक्रम राबवू लागल्या रस्त्यावरची लढाई लढू लागले त्यामुळे समाज जागृत होवून लवकरच एकसंघ होईल असे वाटत होते.पण तेथेही माशी शिंकली.सोशल मिडीयावर समाजाच्या नि महापुरूषांच्या नावाने तयार केलेल्या गृप्सवर सामाजिक चर्चांऐवजी वाढदिवसा,पोस्टर,बॅनर,वैयक्तीक प्रसिध्दी,बिन कामाचे विनोद,वायफळ कविता कथा,राजकीय पक्षांवरील चर्चांनी, घेतली.सामाजिक गृप्सवर राजकिय पक्षांचे कार्यकर्ते घुसले व गृप्सवर असामाजिक चर्चा झडू लागल्या त्यामुळे गृप्सवर संवादाची जागा विवादांनी घेतली. दररोज समाजावर चर्चा करण्याऐवजी जो तो राजकिय पक्षाचा कार्यकर्ता तसेच बामसेफी आणि ब्रिगेडी विचारसरणीच्या लोकांचे वादविवाद विकोपाला जावू लागले रोज गृप्सवर भांडणे होवू लागली आणि त्यात वाचकांचे सामाजिक सुधारणा करणार्या लेखांकडे दुर्लक्ष होवू लागले त्यामुळे सुरुवातीला सामाजिक लेखांना भरभरून मिळणारा प्रतिसाद कमी झाल्यामुळे बहूतेक चांगल्या लेखकांनी आपले लेखन थांबवले ते विवादित व समाजाच्या नावाने स्थापन झालेल्या व त्यात असामाजिक पोस्टला महत्व देणार्या गृप्समधून चांगली लोकं बाहेर पडू लागली व त्यामुळे असामाजिक विकृत लोकांना रानं मोकळे झाले सामाजिक,शैक्षणीक गृप्स विकृतांचे अड्डे झाले.सामाजिक गृप्सवर आता एक दोन सामाजिक पोस्ट सोडली तर असामाजिक,विकृत व राजकीय व वाढदिवसाच्याच पोस्ट जास्तीतजास्त फिरू लागल्या त्यामुळे सामाजिक उत्थानासाठी निर्माण झालेल्या गृप्सची पूर्ण वाट लागली.समाजाच्या परीवर्तनात झोकून घेतलेले अनेक लेखक, कवी,व्याख्याते,सामाजिक संघटना राजकिय पक्षाच्या गळाला लागले व ते समाजाचे काम करण्याऐवजी कोणत्या ना कोणत्या राजकिय पक्षाचा झेंडा घेवून समाजाचे कार्यकर्ते होण्याऐवजी राजकिय पक्षाचे कार्यकर्ते झाले आणि पुन्हा एकदा जोमात आलेली धनगर चळवळ प्रस्थापीत राजकीय लोकं मोडून काढायला यशस्वी झालेत. * आज ही चळवळ पुन्हा जोमाने सुरू ठेवायची असेल तर धनगर समाजातील बुध्दीवादी घटकांने कुठल्याही आमिशाला बळी न पडता फक्त नि फक्त सामाजिक कार्यालाच प्राधान्य दिले पाहिजे.समाज जागा झाला सामाजिक,शैक्षणिक राजकिय आर्थीक दृष्ट्या पुढारला तर तुम्हाला कोणाच्याही मागे धावायची गरज नाही.तुम्ही सक्षम झालेत तर सर्व सुखे तुमच्या मागे धावत येतील फक्त काही दिवस संयम ठेवून आपल्याला आपल्या क्षेत्रात फक्त समाजाचेच काम करावे लागेल तरच समाजाला चांगले दिवस येतील अन्यथा वैयक्तीक आमिशाला बळी पडून जर तुम्ही इकडे तिकडे भरकटत राहीले तर तुमचंही भलं होणार नाही व समाजाचे भले होणार नाही. * त्यासाठी सामाजिक भावनेने प्रेरीत होवून तुमचे जे क्षेत्र आवडते असेल(सामाजिक,आर्थीक,शैक्षणिक व राजकीय) त्यात तुम्ही समाजाचे काम करत राहिलात तर समाज तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही आणि समाजाचा विश्वासघात करून तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न केलात तर समाज तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.जर समाजाचे खरचं परिवर्तन तुम्हाला घडवायचे असेल त्या जास्त काळाची गरज नाही.तुम्ही मनापासून ठरवलं तर समाज परीवर्तनासाठी ५-१० वर्ष पुरेशी आहेत.तुम्ही आम्हाला प्रत्येक तालुक्यातून सच्चे,प्रामाणिक, भारावलेले,तन,मन,धनाने समाजासाठी सर्वश्व पणाला लावणारे फक्त १०० कार्यकर्ते द्या.आम्ही तुम्हाला १० वर्षाच्या आत समाजाचा सामाजिक,शैक्षणीक,आर्थिक, राजकिय चेहरा मोहरा बदलवून दाखवतो.प्रत्येक तालुक्यातून जर १०० समाज प्रेमाने भारावलेले लोक तयार झालेत तर महाराष्ट्रातील ३५९ तालुक्यातून ३५९०० कार्यकर्ते तयार होतील व असे शिलेदार १० वर्षाच्या आत कोणत्याही आमिशाला बळी न पडता समाजाचा चेहरा मोहरा बदलून टाकतील मग कोणाचीच या सक्षम समाजाकडे वाकड्या नजरेने पहाण्याची ताकद होणार नाही.मग आजपासून प्रत्येक तालुक्यातून समाजाचे १०० शिलेदार तयार करा नि आपणच आपल्या समाजाच्या परीवर्तनाचे शिल्पकार व्हा.आपलाच-श्री.सुभाष मासुळे, उडाणे,धुळे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!