आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

मिळकत कराच्या वसुलीसाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमार्फत धडक मोहिम..

भोगवटादराने ३१ मार्च २०२३ अखेर थकीत कराची रक्कम नगपरिषदेकडे जमा न केलेस, कायदेशीर प्रक्रिया अवलंबून जाहीर लिलाव प्रस्तावित करणेचे नगरपरिषदेचे नियोजन. विजयकुमार सरनाईक. मुख्याधिकारी. त.दा.न.प.

Spread the love

मिळकत कराच्या वसुलीसाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमार्फत धडक मोहिम..

भोगवटादराने ३१ मार्च २०२३ अखेर थकीत कराची रक्कम नगपरिषदेकडे जमा न केलेस, कायदेशीर प्रक्रिया अवलंबून जाहीर लिलाव प्रस्तावित करणेचे नगरपरिषदेचे नियोजन. विजयकुमार सरनाईक. मुख्याधिकारी. त.दा.न.प.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी, ५ जानेवारी,२०२३.

नगरपरिषदेचे मालमत्ता कराचे मोठे थकबाकीदार यांना जप्ती वॉरंट बजावलेनंतरही कराची थकीत रक्कम न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या मिळकत सिल करणेची प्रक्रिया दि. १२ डिसेंबरपासून नगरपरिषदेमार्फत सुरु करण्यात आलेली होती.

मागील महिन्यामध्ये नगरपरिषदेने ज्या मिळकतींची रक्कम रुपये ५००००/- पेक्षा जास्त मिळकतकराची थकबाकी आहे, अश्या एकूण ५९३ मिळकतींना जप्ती वॉरंट बजावलेले आहेत. याअंतर्गत ३१ डिसेंबर अखेरपर्यंत शहरातील ५३ रहिवासी मालमत्ता व २० बिगर रहिवासी मालमत्ता अशा एकूण ७३ थकबाकीदार यांच्या मालमत्ता अटकावून ठेवलेल्या आहेत.

अटकावून ठेवलेल्या किंवा जप्त केलेल्या मालमत्तेच्या मालकाने / भोगवटादराने ३१ मार्च २०२३ अखेर थकीत कराची रक्कम नगपरिषदेकडे जमा न केलेस महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १५२ ते १५६ सदर मिळकतींचा योग्य कायदेशीर प्रक्रिया अवलंबून जाहीर लिलाव प्रस्तावित करणेचे नगरपरिषदेचे नियोजन आहे.

सन २०२२-२३ अखेरपर्यंत मिळकत कराचे १००% उद्दिष्ट गाठणेसाठी नगरपरिषदेमार्फत श्री. विजय शहाणे व श्री. तुकाराम मोरमारे यांचे नियंत्रणाखाली २ वसुली पथक नियुक्त करणेत आलेले आहेत. जप्ती वॉरंट बजावलेपासून या पथकामार्फत एक कोटी एक्याऐंशी लाख रुपये रक्कम थकीत मिळकत करापोटी वसूल करण्यात आलेले आहेत.

आता रक्कम रुपये १००००/- पेक्षा अधिक थकीत मिळकत कर असलेल्या थकबाकीदारांना नगरपरिषद जप्ती वॉरंट बजावुन पुढील कार्यवाही सुरु करणार असलेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी सांगितले. तरी जप्तीची व मिळकत सिल करणेची कटु कारवाई टाळणेसाठी मिळकतधारकांनी आपले कराची रक्कम त्वरित नगरपरिषदेमध्ये जमा करावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!