ताज्या घडामोडी

नवापूर येथील जनता विद्यालयामध्ये माता-पिता पूजन दिवस साजरा

Spread the love

पालघर जिल्हा प्रतिनिधी
श्री छत्रपती एज्युकेशन सोसायटी संचालित
जनता हायस्कूल नवापूर येथे प्रेमाचा दिवस म्हणून माता -पिता पूजन करून हा दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला.

या हृदयस्पर्शी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॅमेलीने कॉकुयो चे व्यवस्थापक अजित राणे होते. राणे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यामध्ये लोप पावणारी संस्कृती रुजवणे, काळाची गरज आहे. पालक व पाल्य यांचे मोबाईल मुळे प्रेमात अंतर पडत चालले आहे. ते जवळ आणण्यासाठी अश्या स्वरूपाचे कार्यक्रम शाळेत घेणे गरजेचे आहे.

शाळेचे मुख्याध्यापक संजय निकम यांच्या संकल्पनेतून आणि विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने हा आगळा – वेगळा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाविषयी बोलतांना मुख्याध्यापक निकम यांनी सांगितले की, अलीकडे सोशल मीडियामुळे विद्यार्थ्यांना योग्य अशा संस्कारांची आणि विचारांची देवाणघेवाण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे. अशा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना आपल्या वरिष्ठांविषयी आदर वाढून त्यांच्यामध्ये चांगली नितीमूल्य रुजविता येतील.अत्यंत भावना प्रधान, हृदय स्पर्शी असा हा कार्यक्रम होता.पालक व पाल्यांना अश्रू अनावर झाले होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!