आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने संत तुकाराम महाराज रथाबरोबरच्या पायी दिँड्यामधील वारकऱ्यांना मोफत औषधे वाटप व उपचार..

मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने श्रीविठठल भक्तीने प्रेरित साधना व कृती भक्ती म्हणून पायी दिंड्या तील वारकर्याना रुग्णवाहिका सेवा व मोफत औषधं वाटप चालु आहे

Spread the love

मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने संत तुकाराम महाराज रथाबरोबरच्या पायी दिँड्यामधील वारकऱ्यांना मोफत औषधे वाटप व उपचार..

आवाज न्यूज ता.८ (प्रतिनिधी ) श्री मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने संत तुकाराम महाराज रथाबरोबरच्या असंख्य पायी वारकरी दिंड्यांना मोफत औषधे वाटप करण्यात आले व उपचार करण्यात आले.

वडगाव मावळ येथील श्री पोटोबा महाराज प्रासादिक दिंडी क्रमांक ०५, , संत सेना महाराज दिंडी क्रमांक १३१ , नामदेव महाराज आगे दिंडी क्रमांक रथामागे १७०, , चक्रेश्वर महाराज पायी दिंडी रथामागे क्रमांक ५३ , कडजाईमाता प्रासादिक दिंडी क्रमांक रथामागे क्रमांक १७४,, श्री भामचंद्र डोँगर प्रासादिक दिंडी क्रमांक ६३, तसेच टाकवे बुद्रूक येथील श्री नामदेव महाराज प्रासादिक दिंडी क्रमांक १०२ या मधील तसेच विविध असंख्य पायी दिँड्यामधील वारकऱ्यांना मोफत औषधे वाटप व उपचार मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे संस्थापक नंदकुमार भसे यांचे नेतृत्वाखाली व मंडळाचे आधारस्तंब , श्रीमंत रमेशसिंहजी व्यास यांचे मार्गदर्शनाखाली , आरोग्य विभाग अध्यक्ष सुनिलमहाराज वरघडे , सचिव रामदासजी पडवळ , श्री बांदल महाराज,दादा रासे तसेच योगेश गवळी यांचे हस्ते मोफत औषधे वाटप करण्यात आली तसेच रूग्णांवर उपचार करण्यात आले. यावेळी ह.भ.प.नामदेव महाराज आगे , तसेच मान्यवर उपस्थित होते.

मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने श्रीविठठल भक्तीने प्रेरित साधना व कृती भक्ती म्हणून पायी दिंड्या तील वारकर्याना रुग्णवाहिका सेवा व मोफत औषधं वाटप चालु आहे मंडळाचे अध्यक्ष हभप नंदकुमार शिवराम भसे सचिव-रामदास गणपत पडवळ. कार्यकारिणी सदस्य हभप बजरंग घारे आरोग्य समिती अध्यक्ष हभप सुनिलमहाराज वरघडे .आरोग्य समिती सचिव निलेश शेटे. विभागप्रमुख संजयमहाराज बांदल. कायदेशीर सल्लागार ह भप सागर शेटे सोनालीताई शेलार.हभप भाऊसाहेब रासे.रसिकाताई चव्हाण. योगेश गवळी यांचे विशेष सहकार्य आहे.सदर उपक्रमाचे आयोजन हभप श्रीमंत रमेशसिंहजी व्यास(डायरेक्टर ए.वन.चिक्की.लोणावळा)यांनी औषधं उपलब्ध करुन केले आहे तसेच पंचायत समिती मावळ आरोग्य अधिकारी व स्पर्श हाॅस्पिटलचे डाॅ अमित वाघ यांनी औषध पुरवठा करुन मार्गदर्शन केले. हा उपक्रम श्री क्षेत्र देहु ,आळंदी ते पंढरपूर तसेच मावळ तालुक्यातील सर्व दिंड्या तील वारकर्यासाठी व इतर दिंड्यातील वारकर्यासाठी सुरू आहे या उपक्रमांमुळे अनेक वारकर्याना मदत होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!