ताज्या घडामोडी

पंढरपूर सिंहगड मध्ये इन्होव्हेटीव्ह आयडिया पोस्टर कॅन्टेस्ट २ के २२ उत्साहात संपन्न

Spread the love

पंढरपूर: प्रतिनिधी

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागात मंगळवार दिनांक ८ फेब्रुवारी रोजी एकदिवसीय “पोस्टर प्रेझेन्टेशन” या कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम मोठ्यात उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
सद्या कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव अद्याप कमी न झाल्याने पंढरपूर सिंहगड महाविद्यालय ऑनलाईन विविध उपक्रम राबवत आहे. महाविद्यालयाच्या वतीने “पोस्टर प्रेझेन्टेशन” इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल, नॅशनल डिजीटल लॅबररी ऑफ इंडिया आणि इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग स्टुडंट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने ऑनलाईन पद्धतीने “पोस्टर प्रेझेन्टेशन” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले. यादरम्यान उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी “पोस्टर प्रेझेन्टेशन” या विषयी महत्त्व सांगून मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन सहभाग नोंदवून पोस्टर प्रेझेन्टेशन केले. या मध्ये महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील कुमारी स्नेहल भाकरे या विद्यार्थिनीने “इनोव्हेटिव्ह ॲपलिकेशन इन अर्टीफिशयल इंटेलिजन्स” या विषयावर पोस्टर प्रेझेन्टेशन करून प्रथम क्रमांक प्राप्त केला तर मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील अविनाश शिंदे व इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागातील सौरभ होनमाने यांना द्वितीय क्रमांक मिळाला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य व उपप्राचार्य सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचार्‍यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दत्तात्रय कोरके यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. अनिता शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. प्रदीप व्यवहारे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. श्रीनिवास गंजेवार, प्रा. अंजली चांदणे, प्रा. अर्जुन मासाळ सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!