ताज्या घडामोडी

येळावी मध्ये शिवजयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबीरास युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

Spread the love

प्रतिनिधी ~सौ.मंजुषा पवार.

सामाजिक कार्यकर्ते शुभम पाटील यांच्या प्रयत्नातून तब्बल 111 युनिट रक्त संकलन

*येळावी ता.तासगांव येथे 19 फ्रेबुवारी रोजी शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले होते.त्या शिबिरास युवक वर्गाने चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले आहे.त्यावेळी तब्बल 111 बॉटल रक्तसंकलन झाल्याचे समजले.येळावीतील युवक शुभम पाटील हे दरवेळी अश्या रक्तदान शिबिर चे आयोजन करत असतात आणि त्यातून ते गरजू लोकांना मोफत रक्तपुरवठा करून देऊन सहकार्य करत असतात. ते संत निरंकारी मिशन च्या माध्यमातून नवयुवकांना दरवेळी मानवतेच्या कार्यात समाविष्ट करून घेत असतात.रक्तसंकलन आदर्श ब्लड बँक सांगली यांनी केले त्यावेळी संजय टकले सर उपस्थित होते. परिसरा मध्ये शुभम पाटील आणि त्यांच्या सहकारी मित्र परिवाराचे कौतुक केले जात आहे.शिवजयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये येळावी परिसरातील 111 रक्तदात्यांनी योगदान दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!