ताज्या घडामोडी
नाटोली येथे आयुर्वेदिक मेडिकल व जनरल शॉपीचा शुभारंभ.
शिराळा प्रतिनिधी
नाटोली (ता. शिराळा) येथे आयुर्वेदिक मेडिकल अँड जनरल शॉपीचा शुभारंभ सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांचे हस्ते संपन्न झाला. या वेळी पांडुरंग साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, नाईक दूध संघाचे संचालक अनिल पाटील, आनंदराव चव्हाण, सरपंच तानाजी पाटील, आनंदराव पाटील-शास्त्री, महादेव पाटील, आनंदा पाटील, डॉ. दिलीप पाटील, डॉ. डी. बी. निर्मळे, डॉ. सुजित पाटील, डॉ. सतीश पाटील, डॉ. उत्तम बचे, अमोल चव्हाण, तानाजी निंबाळकर, अनिकेत नाकील, सचिन लोहार व ग्रामस्थ उपस्थित होते.