ताज्या घडामोडी

नव उद्योजक श्री. अमित घबक यांचा इस्लामपूर येथे सत्कार

Spread the love

सांगली अर्बन को ऑफ बँक लि. सांगली, शाखा इस्लामपूर येथे बँकेच्या ४४ व्या वर्धापन दिनानिमित्त वाळवा तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक व उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मान्यवरांचा सत्कार बँकचे चेअरमन मा. श्री. गणेशजी गाडगीळ यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

यावेळी घबकवाडी, ता. वाळवा येथील नव उद्योजक, युवक नेते श्री. अमित माणिकराव घबक यांचा बँकेचे चेअरमन मा.श्री. गणेशजी गाडगीळ यांच्या शुभहस्ते शाल, फेटा, श्रीफळ व बुके देवून यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला.

यावेळी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार श्री. भगवानराव साळुंखे, राजारामबापू पाटील सहकारी बँकेचे चेअरमन मा. प्रा. शामराव पाटील (आण्णा), सांगली अर्बन को ऑफ बँकेचे व्हाईस चेअरमन मा.एच.वाय. पाटील, संचालिका मा. डॉ. सई मंद्रूपकर, नुतन पी. एस. आय. पल्लवी खोत, शाखा सल्लागार बजरंग कदम, उद्योजक श्री. एल. एन. शहा, डॉ. प्रविण पोरवाल, शाखाधिकारी जे. आर. पाटील, श्री. दिपकराव खोत, कृष्णात ऊर्फ बापूराव खोत, राहूल मुळीक, सांगली अर्बन को ऑफ बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. उल्हास नायकसाहेब यांच्या सह बँकचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच सभासद, व्यापारी, उद्योजक व हितचिंतक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!