ताज्या घडामोडी

कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव ने येथे कृषि विस्तार सेवक प्रशिक्षण संपन्न

Spread the love

श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था, भेंडे कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव ने ता. शेवगाव येथे आज दि.३०-०८-२०२२ रोजी लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर स.सा.का. ली., ज्ञानेश्वरनगर यांच्यासाठी विशेषतः ऊस व रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन निमित्ताने प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रशिक्षण कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ. क्षितीज घुले पाटील मा. सभापती शेवगाव पंचायत समिती, श्री. सतीश डावखर, शेतकी अधिकारी , कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्यामसुंदर कौशिक उपस्थित होते.

ऊस शेती संदर्भातील आधुनिक तंत्रज्ञान कृषि विस्तार अधिकारी यांचे मार्फत वेळेत शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती कृषी विस्तार अधिकारी यांना असणे गरजेचे आहे त्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, दहिगाव ने त त्यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ऊस पिकाचे आधुनिक पिक व्यवस्थापन, ऊस पिकासाठी सद्य परिस्थितीत करावयाच्या उपाय योजना याविषयी केंद्राचे प्रमुख डॉ. श्यामसुंदर कौशिक यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात ऊस पिकाच्या लागवडीच्या विविध पद्धती, रब्बी हंगामातील विविध पिकांबद्दल विषय विशेषज्ञ श्री. नारायण निबे यांनी, उस पिकातील एकात्मिक तण नियंत्रण विषयी प्रक्षेत्र व्यवस्थापक प्रकाश हिंगे, ऊस शेतीमधील आधुनिक यांत्रिकीकरण विशेष म्हणजे ड्रोन तंत्रज्ञान या विषयी इंजि. राहुल पाटील, उस पिकासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयी कार्यक्रम सह्हायक प्रकाश बहिरट तर ऊस पिकातील किडींचे एकात्मिक नियंत्रण या विषयी पिक संरक्षण विशेषज्ञ माणिक लाखे यांनी मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उपयोग कृषी अधिकारी यांनी करून घेऊन शेतकऱ्यांसाठी काम करण्याचे आवाहन शेतकी अधिकारी सतीश डावखर यांनी केले. या कार्यक्रमास लोकनेते मारुतराव घुले पाटील स.सा.का. लि., भेंडा येथील अॅग्री ओव्हरसियर तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रवीण देशमुख, दत्ता वंजारी, गणेश घुले, संजय थोटे व कृषि विज्ञान केंद्र प्रक्षेत्रावरील सर्व कर्मचारी यांची खूप मदत झाली.

कृषि विज्ञान केंद्रातील विविध कार्यक्रम श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. आ. नरेंद्रजी घुले पाटील, उपाध्यक्ष मा.आ. चंद्रशेखर घुले पाटील तसेच संस्थेचे विश्वस्त मा.आ. पांडुरंग अभंग, सचिव श्री. अनिल शेवाळे साहेब, सह सचिव इंजि. रविंद्र मोटे साहेब व संस्थेचे विश्वस्त मंडळ यांचे मार्गदर्शनाखाली व्यवस्थित सुरु आहे.

सदर प्रशिक्षण कार्यक्रमाची प्रस्तावना नारायण निबे , सूत्रसंचालन सचिन बडधे तर आभार नंदकिशोर दहातोंडे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!