ताज्या घडामोडी

विश्वासराव नाईक साखर कारखाना आरोग्य शिबिरात ६०० कामगारांची आरोग्य तपासणी.

Spread the love

. शिराळा प्रतिनिधी / चिखली (ता. शिराळा)येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यात काल (ता. १७) व आज (ता. १८) रोजी झालेल्या शिबिरात ६०० कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिराळा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मा. मानसिंगराव नाईक यांच्या २६ जून रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या औचित्याने कर्मचारी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. इ.सी.जी., क्युरेटीन, सी.बी.सी., लिपीड प्रोफाईल, नेत्र, रक्तदाब आदी तपासण्यांचा सहभाग होता. ता. १७ रोजीच्या तपासण्या इस्लामपूर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मार्फत करण्यात आल्या. त्यामध्ये डॉ. मोमीन, डॉ. कपिल घोरपडे व हॉस्पिटलच्या इतर सहकाऱ्यांनी सहभाग घेतला. आज (ता. १८) तपासण्या कोल्हापूरच्या सिध्दीविनायक हॉस्पीटल मार्फत करण्यात आल्या. त्यामध्ये डॉ. मेहताज पठाण, डॉ. संजय देसाई शाबाज इनामदार, आदित्य मोहिते व सहकाऱ्यांना काम पाहिले. तसेल आज जयंत नेत्रालय इस्लामपूर मार्फत नेत्रतपासण्या करण्यात आल्या. ऑक्टीव्ह लाईफ न्यट्रीशन मार्फत कर्मचाऱ्यांना आरोग्य मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य सल्लागार प्रशांत इंगवले यांनी काम पाहिले. दरम्यान काल (ता. १७) शिबीराचे उदघाटन सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते झाले. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग यावर यशस्वीपणे कशी मात करता येते, यावर माधवबाग कोल्हापूरचे डॉ. सचिन पाटील यांनी मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!