ताज्या घडामोडी

हॉटेल व्यवस्थापकांचा प्रामाणिकपणा, ग्राहकाला कुरिअरने पाठविले मोबाईल चार्जर

Spread the love

पालघर जिल्हा प्रतिनिधी तारीख,१५
कोरोना महामारीमुळे जगभरात निर्माण झालेल्या परिस्थितीत हॉटेल व्यवसाय पूर्णपणे डबघाईला आला असल्याने हॉटेल व्यावसायिकांच्या कमाईतही मोठ्या प्रमाणात घट झाली होती. तरीदेखील अशा परिस्थितीतही हॉटेल व्यवसायिकांचा प्रामाणिकपणा हरवलेला नाही याचा प्रत्यय नुकताच आला.

मध्य प्रदेशातील इंदोर- दाहोद महामार्गावरील अवंतिका रिसॉर्ट च्या व्यवस्थापकाने त्यांच्या रिसॉर्टमध्ये नजरचुकीने विसरून गेलेल्या प्रवाशी ग्राहकाचे मोबाईल चार्जर ग्राहकाला घरच्या पत्त्यावर पाठवून एक चांगला आदर्श निर्माण करून प्रामाणिकपणा दाखविला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मध्यप्रदेशातील इंदोर – दाहोद महामार्गावरील अवंतिका रिसॉर्ट मध्ये महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील पालघर येथील मुक्ताई कुटुंब १२ जुलै रोजी रात्रीच्या मुक्कामाला होते. तदनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हे कुटुंब अवंतिका रिसॉर्ट चा निरोप घेऊन मध्य प्रदेशातील उज्जैन येथे मुलीच्या प्रवेशासाठी निघून गेले. मात्र कामाच्या गडबडीमध्ये प्रगती पाटील यांचे मोबाईलचे चार्जर( सहा हजार किमतीचे ) रिसॉर्ट मध्येच राहून गेले असल्याचे उज्जैन येथील कामकाज संपल्यानंतर प्रगती पाटील त्यांच्या लक्षात आले असता अवंतिका रिसॉर्ट व्यवस्थापनाशी संपर्क साधला. रिसॉर्टचे व्यवस्थापक पंकज वैष्णव यांनी तत्काळ खात्री करून मोबाईल चार्जर असल्याचे संबंधित ग्राहकांना सांगितले. तसेच त्यांनी संबंधित ग्राहकांना त्यांचा पत्ता पाठविण्याची विनंती केली. विशेष म्हणजे रिसॉर्ट व्यवस्थापकाने मध्यप्रदेशातून कुरिअरने पाठवलेले मोबाईल चार्जर १५ जुलै रोजी पाटील यांना त्यांच्या पालघर येथील घरी मिळाले. सदरील प्रकाराबाबत रिसॉर्ट व्यवस्थापकांचे मुक्ताई परिवाराकडून कौतुक केले जात आहे.

प्रतिक्रिया…
रिसॉर्ट मध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती आम्हाला देवारुपी समान आहे. माणुसकीच्या नात्याने आपण देखील कुठंतरी समाजाचं देणं लागतो. मी देखील सामान्य कुटुंबातील आहे. मोबाईल चार्जर परत करून मोठे समाधान वाटले आहे.
– पंकज वैष्णव, व्यवस्थापक
अवंतिका रिसॉर्ट

” रिसॉर्ट मध्ये राहिलेले मोबाईलचे चार्जर परत करून रिसॉर्टच्या व्यवस्थापकाने दाखवलेला प्रामाणिकपणा निश्चितच कौतुकास्पद आहे. जगात प्रामाणिक माणसं आहेत याचा प्रत्यय आला.
– प्रगती पाटील, पालघर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!