आरोग्य व शिक्षणकृषीवार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुरुदत्त उत्सव मंडळ यांच्या वतीने श्री दत्त जन्मोत्सव विद्यार्थी दिंडी चे आंबवणे येथे संपन्न..

याप्रसंगी प्रसीद्ध उद्योजक मिलिंद वाळंज  शालिनी वाळंज यांच्या शुभ हस्ते महापूजा व अभिषेक करण्यात आला..

Spread the love

गुरुदत्त उत्सव मंडळ यांच्या वतीने श्री दत्त जन्मोत्सव विद्यार्थी दिंडी चे आंबवणे येथे संपन्न..

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, ७ डिसेंबर..

या प्रसंगी प्रसीद्ध उद्योजक मिलिंद वाळंज  शालिनी वाळंज यांच्या शुभ हस्ते महापूजा व अभिषेक करण्यात आला.

  • सोनू अनाजी वाळंज विद्यालय, व जिल्हा परिषद केंद्र शाळा आंबवणे यातील विध्यार्थ्यानी भाला फेक, गोळा फेक,थाळी फेक, धावणे, संगीत खुर्ची, रांगोळी, चित्रकला या विविध स्पर्धात सहभाग घेऊन बक्षीस मिळवले.

विद्यार्थ्यांची वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले. गायन, वेशभूषा, वादक, उत्कृष्ट फुगडी यात विदयार्थ्यांना मा.आदर्श सरपंच  वत्सलाताई वाळंज यांचे वतीने पारितोषिक देण्यात आली. विद्यार्थी व महिला ह्यांनी उत्सहात सहभाग घेतला. अभंग, गौळण, व फुगडी कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.

याप्रसंगी ह. भ. प. पारकर गुरुजी यांचे भजन व ह भ प कृष्णा महाराज पडवळ, चांदिवली यांचे शुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला.
भजन सम्राट ह भ प नंदकुमार शेटे महाराज मावळ यांचे संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ, भैरवनाथ भजनी मंडळ पवळे वाडी पिरंगुट,महिला भजन मंडळ कुभेरी, त्रिमूर्ती भजनी मंडळं कोळवली, भजनी मंडळ आंबवणे, भजनी मंडळ भांभर्डे यांनी सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम सादर केला.

या उत्सव प्रसंगी शाळेतील विद्यार्थी यांनी भजन कार्यक्रम सादर करून , जन्मोत्सव पाळणा,महा आरती गायन केले.नंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आजी माजी सरपंच, उपसरपंच पो. पाटील
आंबवणे व परिसरातील भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थित होते. विद्यालयातील आजी माजी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!