आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

आम्ही पाहिलेला सर्पमित्र…. देवदुत  तळेगांव दाभाडे !!  किरण मोकाशी काका.

Spread the love

 

आवाज न्यूज: २७ ऑगष्ट.  आम्ही पाहिलेला सर्पमित्र…. देवदुत  तळेगांव दाभाडे !!  किरण मोकाशी काका.

आज तुम्ही आमचं जीवावरच संकट दूर केले. आमच्या घरात आज विषारी कोब्रा जातीचा नाग दिसला आम्ही क्षणाचाही विलंब न करता  किरण काकांना फोन केला.

किरण काकांनी देखील आपल्या हातातील सर्व कामे बाजूला ठेवून साप पकडण्यासाठी लागणारी सर्व साहित्य चिमटा, काठी आणि टॉर्च घेऊन पाच मिनिटां घरी हजर झाले. तो पर्यंत तो नाग पुन्हा दिसेनासा झाला. खुप वेळ शोध घेतला तेव्हा कुठे तो टेबलाच्या खाली दिसुन आला. काकांनी मोठ्या शिताफीने त्या विषारी नागाला पकडले आणि जीवावर बेतलेलं संकट दूर केले.

किरण काका म्हणजे गेल्या वीस वर्षांपासून सगळ्या प्रकारचे साप, नाग पकडतात. आपल्या जीवाची पर्वा न करता ते कितीही विषारी साप असो मोठ्या कौशल्याने पकडतात. आतापर्यंत जवळपास बारा हजार साप त्यांनी पकडले आहे आणि त्यांना वनविभागाच्या माध्यमातून जंगलात सोडून जीवदान दिलेले आहे.

विशेष म्हणजे हे बारा हजार साप पकडल्याची नोंद देखील त्यांच्याकडे आहे.

आज तळेगांव दाभाडे परिसरात जेवढं सर्पमित्र आहे त्यांना किरण काकांनी शिकवलेले आहे. त्यांना भरपूर पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे.

हे सर्पमित्र म्हणजे आपला जीव तर वाचवतात त्याचबरोबर या मुक्या जीवांना वाचवून पर्यावरणाचा समतोल साधतात. ह्या माध्यमातून मला एकच सांगायचे आहे साप दिसला म्हणजे त्याला मारू नका. काही जातींचे साप हे विषारी असतात बाकी सर्वच बिनविषारी असतात. त्यामुळे लगेच तुमच्या जवळच्या सर्पमित्रांना फोन करून त्यांना वाचवा…..!!! किरण मोकाशी यांचा मोबाईल नंबर 9921370834 आहे. तुमच्या घरात, घराजवळ कुठल्याही प्रकारचा साप, नाग दिसला तर तुम्ही त्यांना कधीही फोन करु शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!