आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

बिन दप्तराची शाळा अंतर्गत बुद्धिबळ क्रीडा प्रशिक्षणाचे आयोजन..

श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ समाज प्रेमी आप्पा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये बिन दप्तराची शाळा अंतर्गत बुद्धिबळ क्रीडा प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

Spread the love

बिन दप्तराची शाळा अंतर्गत बुद्धिबळ क्रीडा प्रशिक्षणाचे आयोजन

श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ समाज प्रेमी आप्पा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये बिन दप्तराची शाळा अंतर्गत बुद्धिबळ क्रीडा प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

आवाज न्यूज:   तळेगाव दाभाडे  २४ सप्टेंबर.

इलेक्ट्रॉनिक युगामध्ये मुले बौद्धिक खेळ विसरत असताना यांना पुन्हा प्रोत्साहन देऊन हसत खेळत बौद्धिक विकास करण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
प्रमुख प्रशिक्षक  राजेंद्र माने (आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक) यांनी इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना बुद्धिबळ हा क्रीडा प्रकार कसा खेळायचा याविषयी मार्गदर्शन केले या खेळाचा उपयोग आपण आपल्या दैनंदिन जीवनात करून आपल्या विकास करू शकतो एक चुकीची खेळी आपल्या आयुष्याला वेगळी कलाटिनी देते त्यामुळे खेळाबरोबर आयुष्यात दक्ष रहावे असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे . राजेंद्र माने अंतर राष्ट्रीय प्रशिक्षक समाज प्रेमी आप्पा प्रतिष्ठानचे संचलक मा को अजिंक्य खांडगे श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव  मिलिंद शेलार सर रो.क्ल.एम.रो. आयडीसा सचिन कोळवणकर शालेय मुख्याध्यापिका मा सौ शमशाद शेख मॅडम परीक्षिका . रेणू शर्मा मॅडम क्रीडा शिक्षक .विजय जाधव सर,  प्रशांत  आदी उपस्थित होते.

मिलिंद शेलार सर ,व  अजिंक्य खांडगे यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  राजेंद्र सुमन रघुनाथ माने यांचा स्वागत पर सत्कार केला अजिंक्य  खांडगे यांचा स्वागत पर सत्कार शालेय मुख्याध्यापिका  शमशाद शेख मॅडम यांनी केला.
आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला मा.माने यांनी बुद्धिबळातील विविध तंत्रव डावपेच शिकविले. विद्यार्थ्यांनी तंत्र मनापासून आत्मसात केले. या प्रशिक्षणाचा आनंद घेत त्यांनी बुद्धिबळ खेळाची आयुष्यात कसा उपयोग करावा हे समजून घेतले प्रशिक्षणाचे नियोजन शालेय मुख्याध्यापिका शमशाद शेख यांनी केले सूत्रसंचालन व आभार पर्यवेक्षिका रेणू शर्मा यांनी मानले. या प्रस्तुत उपक्रमाचे श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री संतोष खांडगे ,उपाध्यक्ष श्री दादासाहेब उन्हे,

शालेय समिती अध्यक्षा . रजनीगंधा खांडगे यांनी कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!