ताज्या घडामोडी

आष्टा शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडी जाहीर

Spread the love

आष्टा दि.२८ प्रतिनिधी
आष्टा शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी शबाना मुल्ला,सुजाता वीरभक्त, कांचन माळी, सोनाली कटारे,अश्विनी मालगावे, सरचिटणीसपदी प्रतिभा पेटारे, रेश्मा नायकवडी,चिटणीसपदी शोभा डोंबाळे,जमिलाबी लतीफ,मृदुला कुलकर्णी, सुरेखा कराडे,विद्या मेथे,मंगल सिध्द,सह चिटणीसपदी नंदा कुशिरे,उषा वीरभक्त, सारिका मदने,सुप्रिया वाडकर,आशा नायकवडी,खजिनदारपदी सुवर्णा नाईक यांची निवड करण्यात आली. महिला शहराध्यक्षा तेजश्री बोण्डे यांनी ही कार्यकारि णी जाहीर केली. युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या हस्ते नूतन पदाधिकारी व सदस्यांना निवडपत्रे व शुभेच्छा देण्यात आल्या.
आष्टा येथील या समारंभास जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव शिंदे,माजी अध्यक्ष दिलीपराव वग्याणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील,तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष संजय पाटील महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव,प्रदेश सदस्या कमल पाटील,माजी नगराध्यक्षा स्नेहा माळी,वक्ता सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष जाधव, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रतिकदादा पाटील म्हणाले,आपण शहरातील घरा-घरापर्यंत पोचून महिला वर्गाचे प्रश्न समजून घ्या,ते सोडविण्याचा प्रयत्न करा. आम्ही आपल्या सोबत आहोत. आपणास जे-जे सहकार्य लागेल,ते-ते सहकार्य करू. यावेळी मान्यवरांनी ही मार्गदर्शन करीत नूतन पदाधिकारी व सदस्यांना शुभेच्छा दिल्या.
शहर कार्यकारिणी- संघटक-सरोजनी शिंदे,मनीषा जाधव,पुष्पलता माळी,नीता काळोखे,पदमजा मालगावे,दिलशाद जमादार,सदस्या- स्नेहा माळी, उषा बसुगडे, स्नेहा बसुगडे,निकिता पेटारे,सोनाली बसुगडे, नीता माळी, रंजना विरभक्त,अमृता हालुंडे, मंगल माळी,आसमा मुजावर,आशा नायकवडी,अंजुम इनामदार,सुनीता बसुगडे, स्मिता घस्ते,खैरूनिस्सा मुजावर,स्मिता शिंदे, पद्मजा मालगावे,शबनम जमादार,पौर्णिमा संत्रे,पद्मजा सुतार,शुभांगी चौगुले, शुभांगी पाटील,उज्ज्वला पोळ, रुक्मिणी अवघडे, सुनीता घोरपडे,संगिता हिप्परकर,सुवर्णा बसुगडे,वैशाली माळी, भारती काळे, विमल झिनगे,संगिता घस्ते,वहिदा इनामदार,शाना बाई शेळके,स्नेहलता बसुगडे,गायत्री बसुगडे, अस्मिता बसुगडे,ज्योती वायदंडे,उषा चौगुले, दमयंती इंगळे.जिल्हा वक्ता सेल- सुमित्रा निर्वाने,शुभांगी चौगुले.
प्रारंभी शहराध्यक्षा तेजश्री बोण्डे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी संचालक विराज शिंदे,माणिक शेळके,विशाल शिंदे, रघुनाथ जाधव,संग्राम फडतरे,शिवाजी चोरमुले,सागर जाधव,तसेच आजी-माजी नगरसेवक,पक्षाच्या सर्व सेलचे पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या. दूध संघाच्या संचालिका उज्वला पाटील यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!