ताज्या घडामोडी

आदिवासी हळदीकुंकू सोहळा संपन्न!

Spread the love

प्रतिनिधी-लक्ष्मण राजे

मुंबई:-मुंबई स्थित नंदा फाउंडेशन द्वारा आरे वन्य वसाहतींमध्ये वास्तव्यास असणाऱ्या श्रमिक आणि आदिवासी महिलांसाठी पौष्टिक आहार प्रदान करत हळदी कुंकू सोहळा संपन्न झाला. सदर हळदीकुंकू सोहळ्यास अभिनेत्री अनुजा लोकरे आणि कार्यकारी अध्यक्ष स्वप्निल राणी नंदकुमार प्रामुख्याने उपस्थित होते. आरे वन्य वसाहतीमध्ये दारिद्र्यरेषेखाली जीवनमान व्यतीत करणारी अनेक कुटुंब असून सदर कुटुंब आर्थिक पातळीवर महिला चालवित आहेत. त्यामुळे अशा महिलांना मदत करणे समाजासाठी श्रेयसकर आहे, आणि संस्थेच्या या कार्यात सर्वांनी मिळून सहाय्य करावे असे आवाहन संस्था अध्यक्ष स्वप्निल राणी नंदकुमार आणि अभिनेत्री अनुजा लोकरे यांनी केले. याप्रसंगी वृद्ध महिलांना वस्त्र वाटप करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!