ताज्या घडामोडी

एस्.डी.काकांच्या विचारांची अंमलबजावणी हीच खरी आदरांजली

Spread the love

कै. रामचंद्र चंद्रोजी बारवडे विद्यालय.शिगाव येथे शिक्षण संस्थेचे आधारस्तंभ, संस्थापक, स्वर्गीय खासदार एस.डी.पाटील (साहेब) यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
निष्कलंक चारित्र्य, पारदर्शी राजकारण, स्वच्छ प्रतिमा शिक्षण क्षेत्रातले निरपेक्ष योगदान,परोपकारी स्वभाव, कुटुंब वत्सल मन, वागण्यातील कठोर शिस्त, नीटनेटकेपणा त्याचबरोबर राजकारणात व्यक्तिनिष्ठतेपेक्षा श्रेष्ठ मानलेली पक्षनिष्ठा असे विविधांगी गुण असलेले एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजेच स्वर्गीय सदाशिव दाजी पाटील (साहेब)
कार्यकामाला प्रमुख अतिथी मा.सौ.शैलजा पाटील (माजी सभापती वाळवा पंचायत समिती,इस्लामपूर)
तसेच प्रमुख उपस्थितीत सौ.शिला भासर (पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग प्रमुख वाळवा पंचायत समिती, इस्लामपूर) छायाताई बारवडे (माजी सदस्य वा.पं. समिती,इस्लामपूर.माजी उपसरपंच ग्रा.पं.
शिगाव) तर मा.सौ.राजश्री चेनगे (आशा वर्कर,राष्ट्रवादी काँग्रेस ग्रा.उपा.) तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.एस. एस.येडके सर (मुख्या. कै. रा.चं.बारवडे विद्यालय) शिगाव यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कै.खा एस.डी पाटील साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय श्री.एस. के.माने सरांनी केला. विद्यार्थीनी अनुष्का सचिन पाटील. व कुमारी अनुष्का अनिल पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांनी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की साहेबांची पुण्यतिथी व प्रतिमा पूजन न करता त्यांचे विचार प्रत्यक्षात आपल्या जीवनात प्रत्येक विद्यार्थ्याने उतरवले तर त्यांना खरी आदरांजली ठरेल.
प्रमुख उपस्थितीत असणाऱ्या सौ.शिला भासर आपल्या मनोगतात म्हणाल्या ,माझ्या शाळेत मी आज पाहुणी म्हणून आल्याचा विलक्षण आनंद होत आहे. विद्यार्थी तुम्ही फोन, टिव्ही या मोहजालात न पडता अभ्यास करा व स्वताचे तसेच गावाचे नाव मोठे करा.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री.येडके सरांनी साहेबांनी केलेल्या कार्याचा जीवनपट आपल्या मनोगतामधे सांगितला.कार्यक्रमाचे सूत्र संचालन संस्कृतीक विभाग प्रमुख सौ. मीरा शिंदे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार श्री अतुल पाटील सर यांनी मांडले.या कार्यक्रमाला मार्गदर्शन वाळवा शिक्षण संस्थेचे मानद सचिव एड.श्री. बी. एस. पाटील (आण्णा) ,सहसचिव श्री. धैर्यशील पाटील (बाबा) यांचे लाभले.
या कार्यक्रमाला उपस्थित, श्री एस. ए. जाधव सर,सौ.कुंभार मॅडम ,सौ.चव्हाण मॅडम, पवार मॅडम, श्री.कारंडे सर.शिक्षकेतर कर्मचारी श्री.गुरव श्री.दळवी तसेच विद्यार्थी विद्याधींनी उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!