ताज्या घडामोडी

निलेश सांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिजाऊंच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा उदघाटन सोहळा संपन्न, वाड्यामध्ये ४ दिवस रंगणार कबड्डीच्या राज्यस्तरीय स्पर्धा

Spread the love

प्रमोद पाटील
पालघर जिल्हा प्रतिनिधी तारीख १४
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने वाडा येथील नानाशेठ थोरात क्रीडांगणावर
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आयोजित जिजाऊ चषक २०२२ च्या भव्य कबड्डी स्पर्धेचा उदघाटन समारंभ विधानपरिषेदेचे आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते बुधवारी संपन्न झाला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भगवान सांबरे भावनादेवी सांबरे ( निलेश सांबरे यांचे आई- वडील ), जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे, पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदही वाढाण, सिधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संदेश सावंत, पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे, ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष पंडित पाटील, विक्रमगड नगराध्यक्ष पिंका पडवले, जि. प सदस्य संदेश ढोणे, हबिब शेख, पंकज देशमुख, जेष्ठ पत्रकार शरद पाटील, वाडा पंचायत सभापती रघुनाथ माली, डहाणू पंचायतच्या सभापती स्नेहलता सातवी, नानाशेठ थोरात व आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेचा उदघाटनीय सामना मुंबई महानगरपालिका विरुद्ध सेंट्रल रेल्वे या दोन संघात अतिशय रोमहर्षक झाला. यांमध्ये ३१ विरुद्ध २८ गुणांनी सेंट्रल रेल्वे संघाने विजय मिळवला.

या स्पर्धेत पुणेरी पलटण, संजय घोडावर उद्योग समूह कोल्हापूर, इनकम टँक्स पुणे, सी.जी. एस. टी. मुंबई, पुणे आर्मी, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, महाराष्ट्र पोलीस, ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका, सेंट्रल रेल्वे या महाराष्ट्र राज्यातील १२ व्यवसायिक संघात दमदार असे सामने झाले.

या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ३,३३,३३३ रुपये, द्वितीय पारितोषिक २,२२,२२२ रुपये तर तृतीय व चतुर्थ पारितोषिक प्रत्येकी ६६,६६६ रुपये असणार आहे. तर मालिकवीर ठरणाऱ्या खेळाडूला बाईक असणार आहे. तर लकी ड्रॉ द्वारे एका भाग्यवान प्रेक्षकांला पहिल्याच दिवशी सायकल देण्यात आली.

उद्घाटन प्रसंगी बोलताना विधान परिषद आमदार रवींद्र फाटक यांनी सांगितले की, जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून निलेश सांबरे संपूर्ण कोकणात सामाजिक उपक्रम राबवतात त्याचा सार्थ अभिमान वाटतो व एवढ्या मोठ्या भव्यदिव्य स्पर्धा आयोजित करून खेळाडूंना प्रोत्साहन मिळून दिल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन केले.

याप्रसंगी हेमांगी पाटील, मोनिका पानवे, शशिकांत पाटील, महेंद्र ठाकरे, डॉ गिरीश चौधरी, कैलास पाटील, अरविद ठाकरे, दिनेश पाटील, अरविंद देशमुख, मोजम पटेल जिजाऊ संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!