ताज्या घडामोडी

दिव्यांग कर्मचारी संघटना तालुका अध्यक्ष पदी श्री. छगन पंढरीनाथ पाटील यांची निवड

Spread the love

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधि एस् एम पाटील. महाराष्ट्र राज्य (शासनमान्य) अपंग कर्मचारी संघटना जिल्हा जळगांव यांचे तालुकास्तरीय दिव्यांग कर्मचारी बांधवांचा मेळावा अमळनेर येथे संपन्न झाला .कार्यक्रमाचे म्हणून श्री. गोकुळ आनंदा पाटील हे होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष श्री रविंद्र लोटन पाटील हे होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दादासाहेब श्री. रावसाहेब मांगो पाटील हे होते. कार्यक्रमात उपस्थित रावसाहेब मांगो पाटील यांनी दिव्यांग संघटनेबद्दल माहिती दिली व आपल्या अनुभव कथन केला. व पुढील काळात अपंग संघटनेसाठी आपण सगळ्यांनी एक होऊन एक दिलाने काम करण्याची सर्व सदस्यांना सांगितले. व पुढील काळात अपंगांच्या कोणत्याही समस्या राहणार नाहीत यासाठी सर्वांना आश्वासित केले त्यानंतर मा.बापूसाहेब श्री.रवींद्र लोटन पाटील राज्याध्यक्ष अपंग कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी संघटनेच्या आजपर्यंत केलेल्या कामाची माहिती दिली व पुढील काळात आम्ही आता सर्व एकत्र येऊन पुढील काळात सर्व समस्या दूर होतील कुठलीही समस्या जळगाव जिल्ह्यात अथवा राज्यात राहणार नाही याबद्दल सर्वांना माहिती दिली.व अमळनेर तालुक्याची कार्यकारीणी घोषित केली त्यात तालुकाअध्यक्ष म्हणून श्री छगन पंढरीनाथ पाटील. उपाध्यक्ष, म्हणून श्री धिरज सुकलाल पाटील, सचिव म्हणून श्री.रविद्र धुळाराम लांबोळे,सरचिटणीस म्हणून श्री विजय आनंदा पाटील यांची एकमताने निवड घोषित केली पुढील काळात सर्वांनी एक दिलाने काम करावे दिव्यांग बांधवांची कोणतीही समस्या राहणार नाही अशा शुभेच्छा दिल्या. त्यानंतर श्री.आर.टी.सैदाणे सो.व श्री वाल्मिक मराठे सर यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष व मा.तालुकाध्यक्ष आबासाहेब श्री गोकुळ आनंदा पाटील यांनी आपल्या मागील काळात केलेल्या कामाची माहिती दिली. त्यानंतर आबासाहेब यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप देण्यात आला. कार्यक्रमासाठी दिव्यांग संघटनेचे जळगांव जिल्हाध्यक्ष श्री.महेंद्र पाटील,भडगाव तालुका अतिरिक्त गटविकास अधिकारी श्री. आर.टी.सैदाणे सो.अमळनेर पंचायत समिती विस्तार अधिकारी श्री. पी.डी.धनगर सो.जळगांव जिल्हा केंद्रप्रमुख संघटनेचे अध्यक्ष श्री. रविंद्र साळुंखे,भडगांव तालुका अध्यक्ष श्री.सुनिल महाजन,पाचोरा तालुकाध्यक्ष श्री. विनोद धनगर ,पारोळा तालुकाध्यक्ष श्री. विशाल शिंपी, धरणगांव प्रतिनिधी श्री. सईदशा फकीर जळगांव ग.स.मा.संचालक श्री वाल्मिक मराठे,पारोळा पश्चिम सोसायटी चेअरमन श्री. सचिन वाघ,व व्हा.चेअरमन श्री. अशोक ईसे. संचालक श्री. अनिल पाटील.श्रीम.भारती पाटील श्री.भागवत हाडपे, श्री. नाना कोळी शिक्षक संघटना मा.श्री.राजेंद्र सोनवणे तालुका अध्यक्ष श्री. संदिप वाघ सर मा.अध्यक्ष श्री. जितेद्र शेटे मा.केंद्रप्रमुख श्री. पाठक दादा श्री. ताडे दादा जानवे केंद्रप्रमुख श्री. शरद सोनवणे, ढेकू केद्रप्रमुख श्री. दिलीपराव सोनवणे व बहुसंख्य दिव्यांग बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. छगन पंढरीनाथ पाटील यांनी केले व सुत्रसंचालन श्री. विजय पाटील सर यांनी व उपस्थितांचे आभार श्री. विठ्ठल पाटील सर यांनी मानले.
श्री साई गजानन सेवा मंडळाचे अध्यक्ष एस एम पाटील दहाळे सर विठ्ठल पाटील,गुणवँतराव पवार, निकम दादासाहेब, आर व्हो पाटील यांनी छगन पाटील यांचे अभिनंदन केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!