ताज्या घडामोडी

बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत येऊर हिल्स स्वच्छता मोहीम

Spread the love

विद्या प्रसारक मंडळाचे बांदोडकर विज्ञान (स्वायत्त)महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्र छात्र सेना,ठाणे सिटीझन फौंडेशन व ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत माझे ठाणे सुंदर ठाणे या संकल्पनेतून येऊर हिल्स स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.वायू सेना स्टेशन ते येऊर गावापर्यंत एनएसएस व एनसीसी च्या विद्यार्थ्यांसोबत एनएसएस समन्वयक डॉ.प्रल्हाद वाघ,एनसीसी प्रमुख कॅप्टन बिपीन धुमाळे,डॉ.अजित भूमकर,प्रा.अनिल आठवले, प्रा.विनोद थोरात,जायंटस वेल्फेअर फौंडेशन वन सीचे कौन्सिल सदस्य व सेवानिवृत्त प्रा.प्रकाश माळी, सौ.सीमा आठवले यांनी देखील कचरा वेचून महापालिकेच्या घंटा गाडीवर जमा केला.यावेळी महापालिकेचे श्री.जाधव साहेब यांनी सर्वांना पर्यावरण प्रतिज्ञा दिली.ही स्वच्छता मोहीम यशस्वी होण्यासाठी ठाणे सिटीझन फौंडेशनचे श्री.अगस्टीन साहेब यांचे विशेष सहकार्य लाभले.
याप्रसंगी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येऊर येथील ठाणे महापालिकेच्या शाळेतील आदिवासी विद्यार्थिनींचे सक्षमीकरण हेतू ठाणे सिटीझन फौंडेशनच्या वतीने विद्यार्थिनींना सायकली वाटप करण्यात आल्या.यावेळी कॅप्टन बिपीन धुमाळे,प्रा.अनिल आठवले,प्रा.विनोद थोरात व सेवानिवृत्त प्रा.प्रकाश माळी यांच्या हस्ते काही विद्यार्थिनींना सायकली वितरीत करण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!