ताज्या घडामोडी

नेर्ले येथे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घरोघरी 200 तिरंगा झेंडा केला वाटप….

Spread the love

नेर्ले (ता. वाळवा )येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील अंगणवाडी क्रमांक 197 मधील शिक्षिका सौ. सुजाता दिक्षित मॅडम यांनी हर घर तिरंगा, या 75 व्या स्वातंत्र्ये मोहोत्सवी वर्षा निमित्त घरोघरी 200 तिरंगा झेंडा केला वाटप….. सदर माहिती अशी की, नेर्ले येथील अंगणवाडी क्रमांक 197 येथे बौद्ध, मातंग, तसेच इतर सर्व जाती धर्माची विद्यार्थी या अंगणवाडीत शिकत असून, नेर्ले गावंचे नाक असलेला चौक म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक. याच चौकात अंगणवाडी क्रमांक 197 अगदी दर्शनीय असून या अंगणवाडीच्या शिक्षिका सौ. सुजाता दिक्षित मॅडम या एक आदर्श शिक्षिका म्हणून सदरच्या अंगणवाडीत कार्यरत आहेत , त्या वेगवेळ्या पद्धतीचे उपक्रम राबवित असतात, त्यांनी राबविलेले उपक्रम हे आकर्षक असतात. त्यांच्या या लहान मुलांच्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा प्रयत्न पाहून सर्व नेर्ले गावांतून त्यांचे कौतुक होत आहे. त्यांनी हरघर झेंडा या साठी बौद्ध, मातंग समाज, वाघ गल्ली आणि इतर ठिकाणी घरोघरी जाऊन 200 झेंडे वाटप केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!