ताज्या घडामोडी

इस्लामपूर नगरपालिकेत सत्ता नसताना ही माजी मंत्री,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांनी महाविकास आघाडीच्या राज्य सरकारकडून इस्लामपूर शहराच्या खुंटलेल्या विकासाला चालना देण्यासाठी ११० कोटी रुपयांचा निधी

Spread the love

इस्लामपूर दि.२३ प्रतिनिधी
इस्लामपूर नगरपालिकेत सत्ता नसताना ही माजी मंत्री,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांनी महाविकास आघाडीच्या राज्य सरकारकडून इस्लामपूर शहराच्या खुंटलेल्या विकासाला चालना देण्यासाठी ११० कोटी रुपयांचा निधी दिला असल्याचा विश्वास माजी नगराध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अँड.चिमणभाऊ डांगे यांनी व्यक्त केला.
इस्लामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्याचे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. प्रा.शामराव पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील,माजी उप नगराध्यक्ष दादासो पाटील,युवा नेते खंडेराव जाधव,माजी नगराध्यक्ष सुभाषराव सुर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील,अँड.धैर्यशील पाटील, महिला शहराध्यक्षा रोझा किणीकर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी प्रा.शामराव पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील म्हणाले, ‘कटिबध्दता विकासाची,देऊ साथ राष्ट्रवादी ची’ही आमच्या जाहीरनाम्याची ग्वाही आहे. इस्लामपूर नगरपालिकेतील सत्ताधारी गेल्या पाच वर्षात शहराचा विकास करण्यात पूर्ण अपयशी ठरले आहेत. आ.जयंतराव पाटील यांनी गेल्या अडीच वर्षात शहराच्या विकासा ला जो निधी,त्यातून आम्ही प्रत्येक प्रभागात विकास कामे केली आहेत. त्याचे फलक ‘दिसतोय बदल,होतोय विकास’ या नावाने प्रत्येक प्रभागात लावले आहेत.
माजी उपनगराध्यक्ष दादासो पाटील म्हणाले,नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांना ६० महिन्यात जे करता आले नाही,ते आ. जयंतराव पाटील यांनी ६ महिन्यात करून दाखविले आहे. शहरातील सुज्ञ जनता आ.जयंतराव पाटील व आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाला नक्की साथ देईल.
खंडेराव जाधव म्हणाले,आ.जयंतराव पाटील यांनी शहरातील रस्त्यासाठी जे २७ कोटी रुपये दिले होते. त्याचे व्याजासह ३५ कोटी रुपये झाले होते. त्यातूनच विरोधकांनी भुयारी गटारीचे काम केले. त्यांनी राज्यात त्यांचे सरकार असताना एक रुपयाचा तरी निधी आणला का? आ.जयंतराव पाटील यांनी अलीकडे प्रशासकीय कारकिर्दीत एसटीपीच्या दोन्ही जागा मिळविल्या. मग यांनी पाच वर्षात काय केले?
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अरुण कांबळे,माजी उप नगराध्यक्ष मुकुंद कांबळे,युवा नेते संदीप पाटील,माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे, पिरअली पुणेकर,प्राचार्या दीपा देशपांडे, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहराध्यक्ष सचिन कोळी,कार्याध्यक्ष स्वरूप मोरे,शकील जमादार, गोपाळ नागे,मोहन भिंगार्डे,गुरुराज माने युवती शहराध्यक्षा प्रियांका साळुंखे याप्रसंगी उपस्थित होते. इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना प्रा.शामराव पाटील,अँड.चिमणभाऊ डांगे, शहाजीबापू पाटील,बाळासाहेब पाटील, दादासो पाटील,खंडेराव जाधव,अँड.धैर्यशील पाटील,सुभाषराव सुर्यवंशी, विश्वनाथ डांगे, अरुण कांबळे,मुकुंद कांबळे,रोझा किणीकर, सचिन कोळी व कार्यकर्ते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!