ताज्या घडामोडी

सुप्रसिद्ध तबलावादक गोपाळ धुमाळ यांना गुणगौरव पुरस्कार-2022

Spread the love

प्रतिनिधी-लक्ष्मण राजे

पुणे :- “गुरुत्तम श्रीराम सेवा चॅरिटेबल ट्रस्ट” “गुरुत्तम मित्र मंडळ” आयोजित श्री राम जन्मोत्सव सोहळा निमित्त यंदाचा “गुणगौरव पुरस्कार -2022 ” सुप्रसिद्ध तबलावादक गोपाळजी धुमाळ यांना मा.महापौर मुरलीधरजी मोहोळ व मा.नगरसेवक पृथ्वीराजजी सुतार यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. तसेच श्रीरामजन्मोत्सव किर्तन व महिला भजनी मंडळाच्या कार्यक्रमाचेही आयोजन केले होते. कोरोना योद्धा म्हणून सुरेखाताई दरवडे यांच्या सत्कार करण्यात आला.यावेळी मा.आमदार चंद्रकांतजी मोकाटे मा.आमदार मेधाताई कुलकर्णी, मा. नगरसेवक चंडूशेठजी कदम, किशोरजी शिंदे, राजाभाऊ गोरडे, दामोदरजी कुंबरे, दिलीपजी उंबरकर,सदाशिव दरवडे, माननीय नगरसेविका श्रद्धाताई प्रभुणे, वासंतीताई जाधव, हर्षाली माथवड आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!