ताज्या घडामोडी

दिल्लीतील मुलांना फी संकटातून सुटका करण्यासाठी इयत्ता तिसरीतील अधिराज ( वय ०९)या मुलाने जमवले १,८०,००० रुपये

Spread the love

स्वतः चा गुल्लक तोडून १२,५०० रुपयांतून पाच मुलांची फी भरली..हा तर समाजसेवकांचा नऊ वर्षांचा बापच!..गरजूंच्या मदतीसाठी वय आडवे येत नाही हे अधिराजने दाखवून दिले.अधिराज हा दिल्लीतील मुले,तरुण यांचा Idol बनला आहे.लाचेची प्रकरणे घडत असताना आशेचा किरण म्हणून समोर आला आहे.
अधिराजला शिक्षिका आई फोनवर बोलत असताना १० वी व‌ १२ वी मुलांच्यावर कोसळलेले फी चे संकट समजले. स्वतः चा गुल्लक तोडल्यानंतर पाहुणे, दुकानदार, कार्यालय येथे जाऊन अधिराजने पैसे गोळा करायला सुरुवात केली. एक लाख ऐंशी हजार रुपये जमले.( १,८०,००० रुपये) इयत्ता १० वी व १२ च्या १०० मुलांची फी भरली.करोनाच्या संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या दिल्ली सरकारने इयत्ता १०वी व इयत्ता १२ वीच्या मुलांची फी भरण्यास असमर्थता दर्शविल्यामुळे हजारो गरीब मुलांच्यावर फी भरण्याचे संकट कोसळले.
करोनामुळे नोकरी व‌‌ मजूरीवर परिणाम झाला आहे. गरीब मुला-मुलींना शिक्षण घेताना नाकीनऊ आले असताना. दहावी व बारावीच्या मुलांची फी भरण्यासाठी सरकारने असमर्थता दर्शवल्याने दुसरे संकट कोसळले. अधिराजची आई दिल्ली येथे शिक्षिका आहे.मुलांच्या फी संकटा बाबत आईला बोलताना पाहून अधिराजला मुलांची काळजी वाटू लागली.
अधिराजने आपला गुल्लक तोडून रक्कम पाहिली तर १२,५०० रुपये जमले होते.आई-बाबा यांचेकडे पैसे देऊन ०५ मुलांची फी भरण्यास सांगितले.फीचे पैसे मुलिंकडे देताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून अधिराजला आणखी पैसे जमा करण्याची इच्छा निर्माण झाली.
किमान १०० मुलांची फी भरण्यासाठी १,८०,००० रुपये गरजेचे होते.अधिराज कार्यालय, गल्ली गल्लीत जाऊन तसेच नातेवाईक यांचेकडे जाऊन रोज पैसे जमा करु लागला. आई- वडील यांना लहान मुलाच्या समाजसेवेचे कौतुक वाटू लागले.१,८०,००० रुपये अधिराजने जमा केले.बेगमपुर स्कूल मधील १२ वीच्या ६६ तर १० वीच्या १६ मुलांना सर्व फी चे पैसे वाटले. फी अभावी ही मुले शाळा , कॉलेज सोडणार होती. अधिराज मुळे या मुलांचे शिक्षण परत सुरु झाले. अधिराजने मुलांची हिम्मत वाढविली. अधिराजने लहान वयात केलीली समाजसेवा निश्चितच देवदूतापेक्षा नक्कीच कमी नाही. अधिराज सारखी मुले ही देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत.
करोना काळात,भयंकर संकटात स्वयंघोषित समाजसेवक कुठे होते??? किन्नर, कुष्ठरोगी, भिकारी व‌ दिव्यांग व्यक्ती बरोबर लहान मुले समाजाचं काही देणं लागतो म्हणून पुढे येताना दिसतात.तर दुसऱ्या बाजूला सरकारी नोकरीत असणारी काही माणसे लाच घेताना दिसतात हा विरोधाभास लवकर संपावा असे वाटते.*
कु धनराज आपल्याला साष्टांग दंडवत.आपणास शिक्षिका आईस व वडिलांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभू दे ही परमेश्वराचे चरणी मनोमन प्रार्थना
संपत गायकवाड ( माजी सहाय्यक शिक्षण संचालक)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!