आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रतिभा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सायबर सिक्युरिटी बाबत प्रभात फेरी व पथनाट्याद्वारे जनजागृती.. ..

Spread the love

प्रतिभा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सायबर सिक्युरिटी बाबत प्रभात फेरी व पथनाट्याद्वारे जनजागृती..

आवाज न्यूज : चिंचवड प्रतिनिधी, ३१ डिसेंबर.

कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा महाविद्यालय आणि क्विक हिल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिभा महाविद्यालयातील 23 विद्यार्थ्यांनी विविध शाळा महाविद्यालयांमध्ये जाऊन 12560 विद्यार्थ्यांना आणि सार्वजनिक ठिकाणी 5000 नागरिकांना सायबर सेक्युरिटीच्या संदर्भातील सर्व माहिती देऊन जनजागृती केली.

या निमित्त एकमेळावा नुकताच प्रतिभा महाविद्यालयात झाला. मेळाव्यापूर्वी चिंचवड स्टेशन, मोहन नगर, काळभोर नगर या परिसरात विद्यार्थ्यांनी सायबर सिक्युरिटी विषयी घोषणा देत एक प्रभात फेरी आयोजित केली होती. त्यानंतर मेळाव्यामध्ये याच विद्यार्थ्यांनी सायबर सेक्युरिटी ची आवश्यकता आणि मोबाईलवर व्यवहार करताना असणारे धोके यासंदर्भात एक पथनाट्य सादर केले. त्याला नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा यांनी अभिनंदन केले. संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी या मेळाव्यासाठी मोलाचे सहकार्य केले. या संपूर्ण सायबर सिक्युरिटी मेळाव्याची संकल्पना आणि योजना डॉ. हर्षिता वाच्छानी यांची होती. त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे आणि उपप्राचार्य क्षितिजा गांधी यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्यास पीक हिलचे सायबर सेक्युरिटी संबंधित सर्व अधिकारी आवर्जून उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!