ताज्या घडामोडी

शिवसेनेच्या  ऋतुजाताई लटके यांच्या विजयाने शाहूवाडी पुन्हा चर्चेत

Spread the love

कोकरुड/ वार्ताहर
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार श्रीमती ऋतुजाताई रमेश लटके यांचा  प्रचंड मतांनी विजय झाल्या. उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मशालीच्या चिन्हावर लढत असताना पहिलाच विजय हा शाहूवाडी तालुक्याचे सुपुत्र दिवंगत मा.आमदार रमेश लटके साहेब यांच्या पत्नी आणि शाहूवाडीच्या सुनबाई ऋतुजाताई यांचा झाल्यामुळे  संपूर्ण शाहूवाडी तालुक्यात  आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
निकाल जाहीर होताच अंधेरी येथे या विजयात सामील होण्यासाठी शिवसेना कोल्हापूर दक्षिण विधानसभा संपर्क प्रमुख  बाजीराव कळंत्रे , शाहूवाडी पन्हाळा संपर्क प्रमुख  आनंदराव भेडसे , विभाग प्रमुख  बबन गोगावले, शाखाप्रमुख  मारुती पाटील, प्रकाश पाटील ,  तानाजी सावंत ,  विठ्ठल पाटील,  गणपत पाटील तसेच अनेक शिवसैनिक, पदाधीकारी , शेकडो शाहूवाडकर निकालाच्या ठिकाणी  उपस्थित राहीले. याप्रसंगी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करुन जल्लोष साजरा केला. शाहूवाडी तालुक्यातील  घुमटवाडी सारख्या ग्रामीण भागातील एक  युवक मुंबईसारख्या शहरांमध्ये जाऊन रमेश लटके रूपान आमदार होतो . पण दुर्दैवाने त्यांचं अकाली निधन होत . परंतु त्याच जागेवरील अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत   त्याांच्य पत्नी ऋतुजाताई लटके विजयी झाल्याचे समजताच  विजयाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी शाहूवाडी तालुक्यात ठाकरे समर्थकांनी  फटाक्यांची आतशबाजी करत आनंद साजरा केला . याबद्दल घुमकवाडीच्या ग्रामस्थांनी आमचाा आमदार   वाघ हरपल्यााचे दुःख आहेे.आणि सुन विजयी झाल्याबद्दल आनंद आहे. अशा भावना व्यक्त केल्या.

स्व. आमदार रमेश लटके कायम स्मरणात

शिवसेना आमदार स्वर्गिय रमेश लटके यांनी आपल्या चांगल्या पद्धतीने केलेल्या कार्यामुळे ते नेहमी आम्हां शिवसैनिकांच्या स्मरणात राहतील. स्वर्गिय आमदार रमेश लटके व नुतन आमदार ऋतुजाताई लटके यांच्यामुळे शाहुवाडी तालुका राजकीय पटलावर चमकत राहील.लटके यांनी पोटनिवडणुकीत भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल त्यांचे समस्त शाहुवाडी तालुक्याच्या वतीने हार्दिक अभिनंदन….
बाजीराव कळंत्रे
( शिवसेना कोल्हापूर दक्षिण विधानसभा संपर्कप्रमुख)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!