ताज्या घडामोडी

शिराळा : येथे आंतरराज्य घरफोड्या करणारी तिघांची टोळी जेरबंद करून त्यांच्या कडून जप्त केलेल्या मुद्देमाला सह जेरबंद

Spread the love

शिराळा : येथे आंतरराज्य घरफोड्या करणारी तिघांची टोळी जेरबंद करून त्यांच्या कडून जप्त केलेल्या मुद्देमाला सह उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे सोबत पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश वाडेकर व इतर

शिराळा,ता.२०: शिराळा येथील नलवडे कॉलनीतील घरफोडी प्रकरणी शिराळा पोलिसांनी आंतरराज्य घरफोड्या करणाऱ्या टोळीतील संशयित आरोपी रमेश केशरसिंह मेहडा (वय ३२) , महेंद केशरसिंह मेहडा (वय २९), दोघे रा. भुरीयापुरा पो. भुतिया, ता. गंधवानी जि. धार (मध्यप्रदेश), मनोज जुवानसिंह वास्केल (वय २४) रा. मुहाजा, ता, कुक्षी जि. धार (मध्यप्रदेश) यांना अटक केली असून यातील समरसिंह रतनसिंह भुरिया रा. भुतिया ता. गंधवानी जि. धार (मध्यप्रदेश) व अर्जुन उर्फ भुरु वसुनिया रा. भुतिया ता.गंधवानी जि. धार (मध्यप्रदेश) हे दोन संशयित फरारी आहेत. त्यांना ही लवकरच जेरबंद केले जाईल अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी शिराळा येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी पिंगळे म्हणाले, पाच जून रोजी शिराळा येथील नलवडे कॉलनीत सौ. वनिता परेश पोवार यांचे सोन्याचे दागिने, तर अमन इम्तियाज मुल्ला यांची मोटरसायकल व अंत्री बुद्रुक येथील सुरज शामराव पाटील यांच्या शिराळा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवा केंद्रातून रोख रक्कम असे एकूण तीन लाख ४० हजार रुपयाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता. शैलेश गायकवाड यांची हिरोहोंडा स्प्लेंडर चोरून नेली होती. त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून सी,सी.टी. व्ही फुटेज तपासले असता त्यात पाचजण नलवडे कॉलनीत संशयित रित्या फिरताना दिसले. मोटरसायकल चोरून घेवून जाताना ही दिसले.नलवडे यांच्या शेतात एका ठिकाणी एक टॉवेल व महाराष्ट्र व कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या एस.टी.च्या चार तिकीट आढळून आल्या त्यानुसार पोलिसांनी फुटेज, तिकीट व मोबाईल या वरून पुढील तपास सुरु केला. त्यावेळी सादर आरोपी हे टाण्डा तालुका कुक्षी जि धार ( मध्यप्रदेश ) परिसरात असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलीस अधीक्षक दिक्षित गेडाम,अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबूले यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळा पोलिसांचे पथक मध्यप्रदेश येथील धार जिल्हयात पाठविण्यात आले. त्यावेळी टाण्डा पोलिसांची व सांगली सायबर पोलिसांच्या मदतीने गुन्ह्यातील संशयित आरोपी रमेश मेहडा , महेंद मेहडा, मनोज वास्केल या तिघांना पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश वाडेकर,पोलीस हवलदार कालिदास गावडे, पोलीस नाईक संदीप पाटील, नितीन यादव, अमर जाधव यांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांना १९ जून रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. संशयितांकडून चोरून नेलेल्या दोन मोटरसायकल ज्या ठिकाणी सोडल्या त्या ठिकाणाहून जप्त केल्या आहेत. चोरी झालेल्या तीन लाख ८५ हजार मुद्देमाला पैकी अटक केलेल्या तिघाकडून दोन लाख २२ हजार ४५० रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे. या सराईत चोरट्यांनी २० एप्रिल २०२२ रोजी जालना, अंबेजोगाई ,पैठण व बीड या ठिकाणी चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!