ताज्या घडामोडी

शिराळ्यात गोरक्षनाथ केसरी स्पर्धेस मोठा प्रतिसाद.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी :नागभूमी ३२ शिराळा आयोजित भव्य ओपन बैलगाडा शर्यत (गोरक्षनाथ केसरी) आज शिराळा येथे संपन्न झाली. या शर्यती पाहण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडा शौकीन व गाडा मालक-चालक यांनी मोठी गर्दी केली होती.
या शर्यतीला चांगला प्रतिसाद बैलगाडा प्रेमी आणि बैलगाडा मालकांकडून मिळाला.
शर्यतीचे निकाल पुढील प्रमाणे-
*प्रथम क्रमांक- सदाभाऊ मास्तर व शारदा पाटील (पुणे) यांचा ठाकूर व लक्ष्या
*द्वितीय क्रमांक-वेदिका माने (ओझर्डे, वाघाव) यांचा निशाण व सुंदर
*तृतीय क्रमांक-संग्राम कारंडे (कासारशिरबे) यांचा शंभो व सैतान
*चथुर्थ क्रमांक-बबलू शेळके (शिराळा) यांचा सुंदर व राजा
*पाचवा क्रमांक-जय हनुमान (बेलदारवाडी) यांचा मळ्या व बादल
*सहावा क्रमांक-शारदा पाटील(पुणे) यांचा सुंदर व सरदार
या वेळी बक्षीस वितरण मा.सरपंच देवेंद्र पाटील,मा. नगरसेवक केदार नलावडे,जेष्ठ मार्गदर्शक जयवंतराव गायकवाड काका,युवा नेते संतोष हिरुगडे,मा.विक्रम पाटील साहेब, पै.अर्जुन पाटील,पं.सदस्य लालासो तांबीट, युवा उद्योजक सुजित कदम, मा.दिपक शिंदे सरकार, मा.कुलदीप निकम, युवा नेते उदय गायकवाड, मा.संदीप कदम बबलू,वैभव कुंभार,चेतन शेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले…!
तसेच या बैलगाडा शर्यतीचे नेटके संयोजन मा.राहुल खबाले,श्रीकांत नलावडे, अमित भोसले शेठ,लालासाहेब शिंदे सरकार , तुषार यादव, सचिन दिवटे,अमोल निकम,अमर गायकवाड, सचिन जाधव, सुनील पवार, प्रथमेश गायकवाड, संदीप मुळीक, अभिजित यादव, ओंकार यादव, विशाल भोसले व पंच कमिटी यांनी केले…!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!