क्रीडा व मनोरंजन

मधु चव्हाण अमृत महोत्सवी चषक कॅरम स्पर्धेत न्यूटन ग्लोबल, मराठा हायस्कूलची विजयी सलामी

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी : बाळ तोरसकर

भाजप नेते श्री. मधु चव्हाण यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी चषक आंतर शालेय विनाशुल्क कॅरम स्पर्धेमध्ये वसईच्या इसाक न्यूटन ग्लोबल स्कूल, वरळीच्या मराठा हायस्कूल, भायखळ्याच्या डिसोझा हायस्कूल संघांनी विजयी सलामी दिली. साखळी अ गटात इसाक न्यूटन ग्लोबल स्कूलने बलाढ्य श्री हशू अडवाणी मेमोरियल स्कूल-गोवंडी संघाचा २-१ असा चुरशीचा पराभव करतांना श्रीशांत पालवणकर व याद्नेश देवरेने प्रमुख विजयी खेळ केला. अडवाणी स्कूलचा एकमात्र विजय श्रेयस कांबळेने नोंदविला. स्पर्धेचे शानदार उद्घाटन क्रीडाप्रेमी माजी आमदार मधु चव्हाण, कॅरमप्रेमी दिलीप गोडांबे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कॅरमपटू सुहास पोमेंडकर, देवदास साटम, चंद्रकांत करंगुटकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत झाले. तज्ञांमार्फत शालेय खेळाडूंना मोफत मार्गदर्शन देखील करण्यात आले.

चिंचपोकळी-पूर्व येथे नागरिक विकास केंद्र, बीजेपी-भायखळा व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे सुरु झालेल्या शालेय सांघिक कॅरम स्पर्धेमध्ये साखळी ब गटात मराठा हायस्कूलने अँटोनियो डासिल्व्हा हायस्कूल-दादर अ संघावर ३-० असा विजय नोंदवून साखळी दोन गुण वसूल केले. मराठा हायस्कूलच्या सिमरन शिंदेने शौर्य गिरकरचा २५-० असा, रिषभ मालवणकरने अंकुश वैश्यचा २५-० असा तर तनिष लाडेने अथर्व कीरचा २५-० असा सहज पराभव केला. कार्तिक शिर्केने भाग्येश लोखंडेवर १८-० असा, विराज चुडासमने तन्मय निरभवणेवर १९-० असा तर हेतू बारेजाने आयुष खोपटकरवर १०-२ अशी मात करून दिल्यामुळे डिसोझा हायस्कूल संघाने एसएसएस मल्टी परपज टेक्निकल हायस्कूल-घाटकोपर संघाविरुद्ध साखळी क गटात ३-० असा विजय मिळविला. अन्य साखळी सामन्यात हशू अडवाणी स्कूलने माझगावच्या सर एली कदुरी हायस्कूलचा ३-० असा तर अँटोनियो डासिल्व्हा हायस्कूलने घाटकोपरच्या समता विद्यामंदिर मराठी मिडीयमचा २-१ असा पराभव केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!