ताज्या घडामोडी

२३जून श्यामाप्रसाद मुखर्जी यांना स्मृतीदिना निमित्त विनम्र अभिवादन.

Spread the love

भारत कवितके मुंबई
कांदिवली पश्चिम मधील वार्ड क्रमांक २० चे भाजपा मा.नगरसेवक व कांदिवली चारकोप विधानसभा अध्यक्ष बाळा तावडे, यांच्या कार्यालया समोर जनसंघाचे संस्थापक व अध्यक्ष श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम २३जून २०२२ रोजी आयोजीत करण्यात आला होता.
यावेळी श्यामाप्रसाद मुखर्जीच्या प्रतिमेस बाळा तावडे, यांनी प्रथम पुप्षहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. तसेच वार्ड क्रमांक २० मधील भारतीय जनता पार्टी च्या पुरुष व महिला पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ही विनम्र अभिवादन केले. बाळा तावडे, महामंत्री संजय सिंह व कांदिवली पश्चिम मधील साहित्यिक, पत्रकार,व सामाजीक कार्यकर्ते भारत कवितके यांनी श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जीवन कार्याबाबत माहिती सांगितली.६जुलै १९०१ रोजी कलकत्ता येथे जन्मलेले श्यामा प्रसाद मुखर्जी स्वतंत्र भारत देशाचे पहिले वाणीज्य व वित्त मंत्री होते,१आक्टोबर १९५१,साली त्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली.२३,जून १९५३मध्ये काश्मिरमध्ये कारावासात त्यांचा मृत्यू झाला.भाजपा वार्ड क्रमांक २० च्या या विनम्र अभिवादन कार्यक्रमात बाळा तावडे, संजय सिंह, भारत कवितके, आर एस वर्मा,दिनेश जैस्वाल, समसुद्दीन चौधरी,अफजलखान, चंद्रकांत सुर्वे,विशाल राणे,रेश्मा टक्के,रुपाली चाळके,ज्योती वायकर,लता शेट्टी, अनिता जाधव,लिना शिंदे, प्राची गावडे,रिता कनोजिया,संतोष जाधव,सुदर्शनसिंग,उत्सव जरीवाला,किर्ती बनछोड आदि उपस्थित होते..
भारत कवितके मुंबई मोबाईल ८६५२३०५७००

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!