महाराष्ट्र

लोणावळेकरांची आठवडेबाजार न भरल्याने मोठी गैरसोय.

आठवडेबाजार पुढील शुक्रवारी भरेल.. पंडीत पाटील. लोणावळा नगरपरिषद प्रशासकीय आधिकारी.

Spread the love

लोणावळेकरांची आठवडेबाजार न भरल्याने मोठी गैरसोय. आठवडेबाजार पुढील शुक्रवारी भरेल.. पंडीत पाटील. लोणावळा नगरपरिषद प्रशासकीय आधिकारी.Lonavalekar’s weekly market is not filled with great inconvenience. The weekly market will be held next Friday.. Pandit Patil. Lonavla Municipal Council Administrative Officer.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी, २५ फेब्रुवारी.

लोणावळेकरांची आठवडेबाजार न भरल्याने मोठी गैरसोय झाली आहे. .गेले महिनाभर हा आठवडेबाजार भरत नसल्याने भाजीविक्रेते व नागरिकांची कुचंबणा झाली .गेले महिनाभर भांगरवाडी येथील भुयारी गगटार योजनेच्या कामाला मुहूर्त लागल्याने काम संथपणे सुरू असून हनुमान टेकडी जवळच भरणारा आठवड्यातून एकदा शुक्रवारी भरणारा बाजार बंद आहे.

भांगरवाडी येथील भुयारी गटाराचे काम ऐंशी टक्के पेक्षा जास्त झाल्याने पुढील डांबरीकरण लवकरच होईल व बाजार पुढील शुक्रवारी भरेल ,असे लोणावळा नगरपरिषद प्रशासकीय आधिकारी पंडीत पाटील यांनी सांगितले .
याबाबत कुसगाव बुद्रूक येथील वळकाईवाडी येथे पवनानगरला जाणाऱ्या रस्त्याचे कडेला भरणारा बाजार दोन शुक्रवारी भरल्याने काही प्रमाणात नागरिकांकडून समाधान व्यक्त झाले ;पण वाहनचालकांना कसरत करीतच मार्ग काढावा लागला.

आज कुसगाव बुद्रूक व औंढेखुर्द येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास आधिकारी आर.एस जोशी यांनी सर्व ग्रामपंचायतीचे कर्मचाऱ्यांना घेवून येथील दुकानदारांना उठवून बाजार बंद केला.याबाबत आवाज न्यूज प्रतिनिधीशी बोलताना जोशी म्हणाले , एका शुक्रवारी आंबेगावमधील एका मुलाचा याच रस्त्यावर टेम्पोच्या धडकेने हात गंभीर जखमी होऊन जायबंदी झाला.त्यामुळे लोणावळा ग्रामिणचे पोलिसांकडून सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत लोणावळा नगरपरिषदेकडे प्रशासकीय अधिकारी पंडीत पाटील यांना आठवडेबाजार न भरल्याने लोकांचे हाल बघवत नाही.पर्यायी व्यवस्था डाॕ.पुरंदरे मैदानावर करावी किंवा रायवूड पार्क वर करावी , असे सांगितले .यावर पाटील यांनी भांगरवाडी येथील भुयारी गटाराचे काम ऐशी टक्के पेक्षा जास्त झाल्याने पुढील डांबरीकरण लवकरच होईल व बाजार पुढील शुक्रवारी भरेल ,असे सांगितले .

लोणावळा ग्रामीणचे पोलिस सिताराम बोकड , ठाणे हवालदार किशोर पवार , गणेश होळकर यांना विचारले आसता , त्यांनी कोणत्याही ग्रामपंचायतीचे वर गुन्हा दाखल झाला नाही , असे उत्तर दिले. त्यांनी सत्यता काय आहे, सांगायचे टाळले.

पुढील बाजार  भरणार असल्याचे प्रशासकीय अधिकारी यांनी आश्वासन दिल्याने नागरिकांची गैरसोय टळणार आहे का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!