ताज्या घडामोडी

आदिवासी भिल्ल समाजातील सुनील पवारने सर्वांच्या उंचवल्या नजरा

Spread the love

ईगल न्युज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील

 मायभूभीतील १ली ते १०वी पर्यंतच्या मुलांना विनामुल्य शिकवतो खरा!!
मौजे चिखलोद येथे आदिवासी समाजातील सुनील पवार याने बीए पर्यंत शिक्षण घेतले आहे. पारोळा, अमळनेर अश्या तालुक्याच्या ठिकाणी गणित या विषयाचा शिकवण्यासाठी तो जात असे. त्याचा गणित हा विषय लहानपणापासून आवडीचा आहे त्याने एक दिवस विचार केला की जे विद्यार्थी गरीब व गरजू असतील त्यांना आपण विनामूल्य
शिक्षण देऊ ,असा निर्णय त्याने घेतला तो गावातील तरुण व्यक्ती वाल्मीक पाटील व इतर तरूणाला भेटला त्याने सांगितले की मला गावाच्या मुलासाठी काहीतरी करायच आहे, विनामुल्य शिकवण्या घेऊन गावाच्या मुलांना प्रगती पथावर नेऊन त्यांना उच्शिक्षित करायचं आहे असे विचार मांडल्याने वाल्मीक ने ही बातमी व्हॉट्सॲप च्य मध्यातून ही बातमी गावभर पसरली,२९ विध्यार्थी जमले ,गावकऱ्यांनी शाळा उपलब्ध करून दिली
आणि गुरुपौर्णिमाच्या शुभ मुहूर्तावर क्लासचे उद्घाटन करण्यात आले.त्या प्रसंगी कार्यक्रमाचे
प्रमुख पाहुणे महेंद्र हसन पवार सरपंच चिखलोद कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील साहेबराव पाटील गावातील विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते त्या प्रसंगीं एका आदिवासी समाज बांधवांला अशी संकल्पना मनांत यावी त्यामुळे त्याचे पंचक्रोशीतील नागरिकांकडून कौतुक होत असून सुनील पवार ने ५० विद्यार्थ्यांची बॅच काहीहि करून पूर्ण करून मी शिकवेल अशी आशा व्यक्त केली
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाल्मिक पाटील यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!