ताज्या घडामोडी

लोकाना आपली वाटणारी बॅंक म्हणजे सांगली अर्बन बॅंक :- रमेश हसबनीस

Spread the love

८७ वा स्थापना दिन उत्साहात संपन्न
शिराळा प्रतिनिधी
सध्याच्या काळात लोकाना आपली वाटणारी बॅंक म्हणजे सांगली अर्बन को ॲाप बक होय असे प्रतिपादन हाय्यर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन रमेश हसबनीस यानी शिराळा येथे केले. सांगली अर्बन बँकेच्या ८७ व्या स्थापना दिना निमित्त पान- सुपारी व महिलाना हळदीकुंकू कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होतें. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री शिवाजीराव नाईक होते.
शिराळा शाखा सभागृहात झालेल्या कार्यक्रमात महेश कुलकर्णी यानी स्वागत व प्रास्ताविक केले.रमेश हसबनीस व मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय आण्णा गोडबोले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी रमेश हसबनीस, माजी. मंत्री शिवाजीराव नाईक, सुखदेव पाटील यांचा सत्कार सल्लागार वसंतराव यादव,सुमंत महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जेष्ठ सभासद, कर्जदार सर्वश्री सी.ए. संतोष नलवडे, बाळकृष्ण शेटे, डी.बी. कुलकर्णी, कृष्णा यादव, संतोष शिनगारे, रणजित कुरणे, सागर सुर्वे यांचा सत्कार संतोष देशपांडे,बी. टी. निकम, माणिक पाटील, सुरेश माने, अरविंद काळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना सी. ए, संतोष नलवडे म्हणाले की शिराळ्यात अनेक राष्ट्रीय बॅका असताना सुध्दा सांगली अर्बन बॅंकेने व त्यांच्या अधिकारी यानी चांगली सेवा देऊन सर्वांना आपलेसे केले आहे. सोन्यासारखा चोख व्यवहार असणारी हि बॅंक सर्वांना विकासच्या दिंशेने नेत आहे. या बॅंकेत कर्जदाराना नेहमी सहकार्य केले जाते. तसेच याच बॅंकेत कर्जदारांचाही सत्कार केला जात आहे हे दूर्मिळ आहे. यावेळी बोलताना चेअरमन रमेश हसबनीस म्हणाले की या बॅंक शाखेने गेली ४० वर्षे ग्राहकांना निरक्षेप वृत्ताने सेवा दिली आहे. यामध्ये सर्वांचे योगदान आहे.शिराळ सारख्या ग्रामिण भागात बॅंकेबाबतचे अज्ञान दुर करण्याचे काम केले आहे. संचालक,अधिकारी व कर्मचारी हे एका ध्येयाने काम करत आहेत असे सांगितले. माजी मंत्री शिवाजीराव नाईक यावेळी सर्व बॅंक व्यवहाराची माहीती घेऊन समाधान व्यक्त केले. आज शाखेने ग्राहकासाठी क्यु. आर. हि सोय केली आहे. या कार्यक्रमाला वाचनालयाचे अध्यक्ष सुनील हसबनीस, श्री दत्त नागरी पत संस्थेचे अधिकारी विजय पाटील, सुरेश कुलकर्णी, सौ. शालवी महाजन, सौ. वारणा बाऊचकर, सौ. आवटे, सौ. मंजीरी देशपांडे,श्रीमती शुभदा जोशी इत्यादी उपस्थित होते. यावेळी महिला साठी हळदी- कुंकु कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सूत्रसंचलन महेश कुलकर्णी यानी केले तर आभार बी. टी. निकम यानी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!