महाराष्ट्रमावळलोणावळा

दि.२९/११/२०२३ रोजी भारताच्या राष्ट्रपती महामहिम श्रीमती द्रौपदी मुर्मू या लोणावळा येथील कैवल्यधाम योगा केंद्र येथे gvभेट देवुन आंतरराष्ट्रीय परिषदेचे उदघाट्न करणार आहेत.

Spread the love

दि.२९/११/२०२३ रोजी भारताच्या राष्ट्रपती महामहिम श्रीमती द्रौपदी मुर्मू या लोणावळा येथील
कैवल्यधाम योगा केंद्र येथे भेट देवुन आंतरराष्ट्रीय परिषदेचे उदघाट्न करणार आहेत.

आवाज न्यूज : प्रतिनिधी श्रावणी कामत, २९ नोव्हेंबर.

मा.राष्ट्रपती महोदयांच्या या दौ–याच्या निमित्त प्रशासन सज्ज झाले असुन, पोलीस विभागाकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.माननीय राष्ट्रपती महोदया आयएनएस शिवाजी ते कैवल्यधाम योगा केंद्र नियोजित कार्यक्रमासाठी जाणार असुन, सुरक्षेच्या उपायोजना म्हणून पोलीस प्रशासनाकडून आयएनएस शिवाजी ते कैवल्यधाम यामार्गावरील वाहतूक मा.राष्ट्रपती महोदया यांचे सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील वाहतुकीमध्ये व्यवस्थापनाच्या दृष्टीनेमहाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३६ अन्वये बंदोबस्ताचे मुख्यमार्गावरील वाहतूक दि. २९/११/२०२३ रोजी दुपारी १४:०० वा ते सायंकाळी १७:०० वा यावेळेत अंशतः निर्बंध घालण्यात येत आहे.

सदर बाबत,पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३६ अन्वये आदेश पारीत करण्यात
आले आहे. तसेच नागरीकांनी पोलीसांना सहकार्य करावे . पर्यायी मार्ग.पुणे बाजुकडून एक्सप्रेस वे वरुन येणारी वाहने ही लोणावळा येथे न येता एक्सप्रेस वे ने मुंबई कडे
जातील तसेच पुणे कडून जुन्या हायवे ने येणारी वाहने ही कुसगाव टोलनाका येथून एक्सप्रेस वे ने
मुबई बाजुकडे जातील.

मुंबई बाजुकडून एक्सप्रेस वे ने येणारी वाहतूक ही खंडाळा एक्झीट येथून खाली न उतरता पुणे बाजुकडे
सरळ जातील. तसेच लोणावळा एक्झीट ने खाली येवून पुणे बाजुकडे जातील. लोणावळा शहरातील वाहन धारकांनी सदर वेळेत आपली वाहने शक्यतो आणू नये.ड्रोन, पॅराग्लायडींग तसेच एअर बलून असे लोणावळा शहर व परीसरात उडडाणास प्रतिबंध करण्यात आलेला आहे.सत्यसाई कार्तिक भापोसे सहा पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा विभाग, लोणावळा यांनी आवाज न्यूजला दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!