श्री विनायक राऊत यांची श्री क्षेत्र गणपतीपुळे देवस्थानच्या अध्यक्षपदी निवड.
श्री विनायक राऊत सर यांची “श्री क्षेत्र गणपतीपुळे देवस्थानच्या अध्यक्ष”पदी निवड झाले बद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन. व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.!
एक मनमिळावू व्यक्तीमत्व,यशस्वी शिक्षक अन्य बांधवाना प्रेरणा देणारे व मार्गदर्शन करणारे म्हणजे राऊत सर.आपण गणपतीपुळे ‘भक्त निवास’ सारख्या अनेक चांगल्या गोष्टी केल्या व देवस्थानची अनेक काम केली,अनेक उपक्रम राबवले .
तुमचा स्वभाव ,तुमचं वागणं आम्हाला सतत आठवतच असत व प्रेरणा देणार असत.आपल प्रत्येकाशी असलेल प्रेमाच नातं असच अतुटच राहू दे.
तुमचं आणि तुमच्या परिवाराचे इथून पुढचं आयुष्यही असंच सुखा-समाधानाचे, आनंदाचे , निरोगी आणि भरभराटीचे जावो ही श्री.गणेश चरणी प्रार्थना….!
संस्थान श्रीदेव गणपतीपुळे, ट्रस्टी चे नवनिर्वाचित पदाधिकारी पुढीलप्रमाणे-श्री.विनायक तुकाराम राऊत – सरपंच.,श्री.अमित प्रभाकर मेहेंदळे- खजिनदार, श्री.विद्याधर वासुदेव शेंड्ये – सचिव, श्री.विवेक यशवंत भिडे- पंच,श्री. निलेश श्रीकृष्ण कोल्हटकर – पंच, श्री.श्रीराम विश्वनाथ केळकर. -. पंच श्री . श्रीहरी जनार्दन रानडे -पंच.यांची निवड करण्यात आली.