आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

युथ आयकॉन म्हणजेच” युवा विवेक पुरस्कार 2023″– हा समारंभ दिमाखात दिनांक ,23 जानेवारी रोजी साजरा —

लायन्स क्लब तळेगाव आणि प्रतिभा इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने, चिंचवड येथील प्रतिभा इन्स्टिट्यूटच्या अतिशय अद्ययावत सभागृहात युथ आयकॉन हा अत्यंत देखणा समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला!

Spread the love

युथ आयकॉन म्हणजेच” युवा विवेक पुरस्कार 2023″– हा समारंभ दिमाखात दिनांक ,23 जानेवारी रोजी साजरा —

लायन्स क्लब तळेगाव आणि प्रतिभा इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने, चिंचवड येथील प्रतिभा इन्स्टिट्यूटच्या अतिशय अद्ययावत सभागृहात युथ आयकॉन हा अत्यंत देखणा समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला!

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २५ जानेवारी.

१२ जानेवारी हा स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस, युथ आयकॉन म्हणून संपूर्ण देशात साजरा करण्यात येतो! याचेच औचित्य साधून या वर्षाचा हा पुरस्कार चिंचवड येथील भूषण तोष्णीवाल या दिवदृष्टी असलेल्या युवकास सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला! भूषण केवळ वीस दिवसाचा असताना त्याची दृष्टी गेली! संकल्प सिद्धीसाठी अनेकजण काबाड कष्ट करतात! पण जन्मताच दृष्टी गेलेली आहे! त्यामुळे अनेक अडचणींचा डोंगर समोर उभा आहे! अशावेळी भूषण च्या अडचणीच्या प्रत्येक पावला पावलावर त्याच्यामागे भक्कमपणे उभे राहिलेत ते म्हणजे त्याचे पिताश्री चार्टर्ड अकाउंटंट. नंदकिशोरजी तोष्णीवाल आणि भूषणच्या मातोश्री  विजया तोष्णीवाल,

यांच्या अथक आणि अविरत साधनेतून *भूषण स्वतः चार्टर्ड अकाउंटंट झाला.एवढेच नव्हे तर संगीताअलंकार आणि उत्कृष्ट मोटिवेटर स्पीकर,टं म्हणूनही संपूर्ण महाराष्ट्रभर गाजला! म्हणून त्याचा सत्कार करताना आम्हा लायन परिवाराला विशेष आनंद होत आहे! दीप प्रजनन करताना स्वतः भूषणने गणेश वंदना अत्यंत भावपूर्ण शब्दात सादर केली !

अध्यक्ष मयूर राजगुरव यांनी सर्वांचं स्वागत करताना अतिशय मोजक्या शब्दात मान्यवरांचा परिचय करून दिला! प्रकल्प प्रमुख लायन डॉक्टर शालिग्राम भंडारी यांनी आपल्या प्रास्ताविकात असे समारंभ साजरे करण्यामागे असलेली लायन्स क्लबची भूमिका विविध उदाहरणे- शेरोशायरी आणि काव्यपंक्ती सभागृहापुढे सादर करून स्पष्ट केली!अमेरिका निवासी  नारायणजी चांडक यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपले नेहमीच सहकार्य असेल असं आपल्या मनोगतात व्यक्त केलं! यानंतर माजी प्रांतपाल- प्रतिभा इन्स्टिट्यूटचे सरचिटणीस- लायन दीपकभाई यांनी भूषणच मनापासून कौतुक आणि अभिनंदन केलं! पूर्ण दृष्टी नसलेल्या भूषणने विविध क्षेत्रात जे नैपुण्य प्राप्त केलेल आहे त्याचा आदर्श घेणे म्हणजेच आजच्या या समारंभाच फलित असेल असं आपल्या मनोगत विशद केलं! स्मृतिचिन्ह सन्मानपत्राचा नम्रतेने स्वीकार करताना भूषणने आपल्या मातापित्यांनी घेतलेल्या कष्टांचा उल्लेख कृतज्ञतापूर्वक भावनेने व्यक्त केला.

विविध क्षेत्रातील यशप्राप्तीनंतर राष्ट्रपतींच्या शुभहस्ते माझा जो सन्मान केला गेला त्याचे खरे हकदार माझे जन्मदाता माता पिता आहेत ! याचीही स्मृती भूषणने अतिशय भीज शब्दात व्यक्त केली! लायन्सचे  विद्यमान प्रांतपाल राजेशजी कोठावदे, यांनी भूषणच्या स्वभावाच्या विविध पैलूवर प्रकाश टाकला! आपल ध्येय जर निश्चित असेल तर अविरत कष्टातून आपणही अनेक अडचणीवर मातकरून भूषण सारखंच आपलं स्वतःचं एक आदर्श व्यक्तिमत्व समाजापुढे निश्चित ठेवू शकतो असा विचार प्रांतपालांनी पुढे आपल्या मनोगतात व्यक्त केला. भूषणचा अतिशय देखणा असा सन्मान केल्याबद्दल भूषणचे पिताश्री  नंदकिशोरजी यांनी संस्थेचे आणि लायन्स क्लबचे मनापासून आभार मानले! समन्वय अधिकारी- लायन तेजश्री अडीगे यांनी भूषण दहावर्षाचा असल्यापासून त्याच्यातील कलागुण मी बघत होते! अनुभवत होते आणि त्याला वेळोवेळी प्रोत्साहनही देत होते याचा आज मला खरोखर मनापासून आनंद होत आहे! अशा भावना तेजश्री मॅडमने आपल्या आभाराच्या मनोगतात व्यक्त केल्या.

लायन राधेश्याम भंडारी आणि लायन प्रमिला वाळुंज यांच्या अतिशय अप्रतिम सूत्रसंचालनामुळे समारंभाची उंची वाढली होती! सभागृहातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक उत्तम संदेश देणारा असा अविस्मरणीय समारंभ अनुभवल्याची अनुभूती त्यांच्या नजरेत दिसत होती! निवेदक– लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारी मित्रांनो– सत्कारार्थी दिव्य चक्षु भूषणने परीक्षेचे पेपर लिहिताना माझी आई माझी रायटर होती म्हणून ती स्वतः जर्मन भाषा शिकली! तिने अकाउंटचा इतका अभ्यास केला होता की ती स्वतःही सीए झाली असती! तसेच ती तबलाही शिकली! माझे वडील पेटी शिकले म्हणून मी या दोन्ही क्षेत्रात थोडेफार यश कमवू शकलो! म्हणून मी त्यांचा आयुष्यभर ऋणी राहीन! असेही मनोगत भूषणने व्यक्त केले!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!