ताज्या घडामोडी

युवा नेते प्रतिकदादा पाटील यांनी मर्द वाडी येथील चिमुकल्या आशिषच्या हातात नवे कोरे ‘स्मार्ट वॉच’ बांधून त्याचा ‘बालहट्ट’ पुरा

Spread the love

इस्लामपूर दि.७ प्रतिनिधी

कु.आशिषच्या चेहऱ्यावरचा आनंद व समाधान पाहून उपस्थित सर्वजण चांगलेच सुखावले. या घटनेची आष्टा व मर्दवाडी परिसरात चर्चा सुरू आहे. प्रतिकदादांना लहान मुले व प्राणीमात्रावर चांगलाच जीव आहे.
प्रतिकदादा हे काही दिवसापूर्वी आष्टा येथे काही कार्यक्रमाच्यानिमित्त गेले असता,ते स्नेहभोजनास मर्दवाडी येथील माजी पं.स. सदस्य जनार्दन पाटील (भाऊ) यांच्या घरी गेले. त्यांनी दादांचे यथोचित स्वागत करून सत्काराचा फेटा बांधला. त्यावेळी तिथे त्यांचे चुलत भाऊ यशवंत पाटील यांचा मुलगा कु.आशिष उपस्थित होता,त्यानेही दादांचे शेक हॅन्ड देत स्वागत करून दादांशी गप्पा मारल्या. इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या चिमुकल्याचा चुणचुणीतपणाआणि धीटपणा पाहून दादांनी आपल्या डोक्यावरचा फेटा त्याच्या डोक्यावर घातला. त्याला अतिशय आनंद झाला.
यावेळी बोलता-बोलता त्याने दादांच्या हातातील घड्याळाकडे बोट करीत हे काय आहे? अशी चौकशी केली. तेंव्हा दादांनी हे स्मार्ट वॉच आहे,तुला हवे काय? अशी विचारणा केल्यावर त्याने मान हलवीत संमती दर्शविली. यानंतर दादा मुंबईला गेले. साधारण आठवड्याचा काळ गेला असेल.
दादांनी मुंबईवरून येताना आठवणीने आशिषसाठी स्मार्ट वॉच आणले आणि भाऊंना आशिषला कारखान्यावर घेवून येण्याचा निरोप दिला. दादांनी कारखाना कार्यस्थळावर स्वतः आशिषच्या हातात घड्याळ बांधल्यानंतर कु.आशिषच्या चेहऱ्यावर आनंद व समाधानाच्या छटा पाहून सर्वजण सुखावले. यावेळी जनार्दनभाऊ पाटील,प्रगतशील शेतकरी शरद जामदार (काकाचीवाडी),सुशांत पाटील (मर्दवाडी) यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!