ताज्या घडामोडी

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दलित पँथर सुवर्ण महोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन

Spread the love

मुंबई: ‘दलित पँथर’ ही दलितांची अस्मितादर्शक चळवळ तरुणाईच्या जागतिक उत्थापनाच्या पार्श्वभूमीवर जन्माला आली आणि आंबेडकरी चळवळीत नवचैतन्य निर्माण केले. या घटनेला आज 50 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने ‘पँथर’ या दलित पँथर सुवर्णमहोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन नुकतेच ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात कार्यरत असलेले आंबेडकरी चित्रकार, कवी, लेखक डॉ. सुनील अभिमान अवचार यांनी ‘दलित पँथर’च्या या विशेषांकाचे संपादन केले आहे. प्रकाशन सोहळय़ाला शिवसेना नेते सुभाष देसाई, सुषमा अंधारे, ज्येष्ठ कवी लेखक, दलित पँथरचे एक संस्थापक अर्जुन डांगळे, ‘परिवर्तनाचा वाटसरू’चे संपादक अभय कांता, फुले-आंबेडकरी वाङ्मयकोशाचे संपादक डॉ. महेंद्र भवरे, ज्येष्ठ कवयित्री हिरा बनसोडे, उर्मिला पवार, प्रज्ञा पवार, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक सुनील कदम, चित्रकार प्रकाश भिसे, डॉ. विजय पट्टेबहादूर उपस्थित होते.

विशेषांकामध्ये दलित पँथर चळवळीचा आढावा, पँथर्सचे स्वकथन, पँथर्सविषयी स्मरण लेख, मुलाखती तसेच पँथर्सविषयीच्या कविता प्रकाशित केल्या आहेत. पँथरकडे जुनी पिढी, बुद्धिजीवी, आजची तरुणाई कोणत्या दृष्टिकोनातून पाहते याचाही वेध या अंकात घेण्यात आला आहे. सोबतच पँथर्सचे काही दुर्मिळ दस्तऐवज या विशेषांकातून वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!