ताज्या घडामोडी
पावस विद्यामंदिरमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
पावस:–रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर पावस प्रशालेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी.जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक श्री बी. बी. माने यांनी प्रास्ताविक केले.त्यानंतर कला विहार मंडळाचे सभापती श्री व्ही. बी. काटे यांनी ‘तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा’ असे ठणकावून सांगणारे नेताजी सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याची माहिती सांगितली.त्यानंतर पर्यवेक्षक श्री बी बी माने यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.