आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

तळेगाव व लोणावळा नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी गुरुवारी आरक्षण सोडत

नगराध्यक्ष पदासाठी कोणते आरक्षण येते याकडे देखील सर्वच राजकीय लोकांचे लक्ष लागले आहे.

Spread the love

राजकीय तळेगाव व लोणावळा नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी गुरुवारी आरक्षण सोडत…

आवाज न्यूज: तळेगाव प्रतिनिधी, मच्छिंद्र मांडेकर 26 जुलै.

तळेगाव दाभाडे व लोणावळा या दोन्ही नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी गुरुवारी (दि. २८) नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) आरक्षण सोडत जाहीर करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका या ओबीसी आरक्षणासह होणार आहे. यानुसार ओबीसींची सदस्य संख्या निश्चित करण्यात येणार आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत एकूण १४ प्रभाग असून यामध्ये २८ नगरसेवक निवडले जाणार आहेत. प्रभाग क्रमांक ३, ४ व १० या मधून अनुसूचित जातीचे दोन व अनुसूचित जमाती एक यांचे आरक्षण यापूर्वी पूर्ण झाले असल्याने उर्वरित ११ प्रभागांसाठी ही सोडत करण्यात येणार आहे.

आरक्षण सोडत दिनांक वार गुरुवार दिनांक २८/०७/२०२२

वेळ: सकाळी / दुपारी ११.०० वा. स्थळ: सरदार अजितसिंहराजे दाभाडे सरकार व्यापारी संकुल विंग बी, तिसरा मजला, तळेगाव दाभाडे

हरकती व सूचना आरक्षण सोडत संबंधित कालावधी (हरकती व सूचना मुख्याधिकारी यांच्याकडे निवडणूक कार्यालय अथवा संबंधित प्रभाग कार्यालयाचे मुख्यालय येथे सादर कराव्यात.)वार शुक्रवार दिनांक २९/०७/२०२२. तर लोणावळ्यात एकूण १३ प्रभाग असून त्यातील एकूण ३ जागा आरक्षित करण्यात येणार आहे. गुरुवारी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यासाठी आरक्षित झालेले प्रभाग वगळून इतर ७ प्रभागासाठी चिट्टया टाकून त्यातील ३ प्रभाग आरक्षित केले जाणार आहेत.

आरक्षण सोडती दरम्यान ओबीसी आरक्षण कोणत्या प्रभागामध्ये येईल याकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे. तसे नगराध्यक्ष पदासाठी कोणते आरक्षण होणार .

नगराध्यक्ष पदासाठी कोणते आरक्षण येते याकडे देखील सर्वच राजकीय लोकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!