ताज्या घडामोडी

पत्रकारिता करीत असताना निपक्षपाती करावी जेणेकरून आपली प्रतिमा उंचावेल -डॉ. किशोर पाटील

Spread the love

पद्मश्री अण्णासाहेब जाधव जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने विद्यार्थ्यांना पत्रकार क्षेत्राकडे वळविण्याचा स्तुत्य उपक्रम!
भिवंडी दि.२५(स्व.रा.तो)
पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ भिवंडी संचलित बी. एन. एन. महाविद्यालय भिवंडी येथे राज्यशास्त्र विभाग व मास मिडिया विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २४ फेब्रुवारी ते १० मार्च २०२२ दरम्यान पत्रकारिता प्रशिक्षण प्रमाणपत्र कोर्स सुरू करण्यात आले आहे. या प्रमाणपत्र कोर्स चे उद्घाटन भारतीय समाज उन्नती मंडळाचे सरचिटणीस श्री.आर.एन.पिंजारी यांच्या शुभहस्ते ऑनलाईन गुगल मीट ॲपद्वारे करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या सत्रात दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील
यांना गुन्हेगारीकरण या विषयासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून बोलविण्यात आले होते, तसेच या पत्रकार प्रशिक्षण प्रमाणपत्र कोर्स साठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक वाघ, उपप्राचार्या डॉ.के.एन.पाटणकर- जैन, मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य भिवंडी महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ.श्री.रवींद्र रसाळ, व प्रा. मयुरेश देशपांडे,तर मास मिडिया विभाग प्रमुख प्रा.सौ. प्रियंका निकेत ठाकूर व प्रा. अशोक बैरी,IQAC चे चेअरमन को-ऑर्डिनेटर डॉ.श्री.एस्.आर. म्हाळूंणकर,
भूगोल विभागाचे विभाग प्रमुख डॉ.राजू रूपवते, अर्थशास्त्र विषयाचे विभाग प्रमुख प्रा.कल्पना मुळे , अर्थशास्त्र विषयाचे प्रा.डॉ. विकास उबाळे , अर्थशास्त्र विषयाचे प्रा.मिलिंद , अर्थशास्त्र विभागाचे प्रा.संजय मुंढे , हिंदी विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.पगारे, उर्दू विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ. रईस रौनक, राज्यशास्त्र विषयाचे प्रा. मयुरेश देशपांडे , क्रीडा विभागाचे डायरेक्टर डॉ. चंद्रकांत म्हात्रे. आदी प्राध्यापक वर्ग तसेच शिक्षक आणि महाविद्यालयीन विद्यार्थी वर्ग ऑनलाईन गुगल मीट ॲपद्वारे उपस्थित होते.यावेळी राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.रविन्द्र रसाळ व मास मीडिया विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका सौ.प्रियंका निकेत ठाकूर यांनी प्रमुख व्याख्याते महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा दैनिके स्वराज्य तोरणचे संपादक डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील यांचा सर्व उपस्थितांना परिचय करून दिला. भिवंडी महाविद्यालयाच्या वतीने पत्रकारिता प्रमाणपत्र कोर्स चे आयोजन केले आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी आयोजकांचे मनापासून आभार मानतो.
गुन्हेगारीकरण सध्या मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे कारण जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत, त्यामुळे आई, वडील, बहिण, भाऊ, नातेवाईक हे दुरावले गेले आहेत सर्व नात्यांना तडे गेल्याचे दिसून येत आहे, पैशामुळे सर्व हित संबंध तोडून भाऊ भावाला विसरला गेला आहे त्याचप्रमाणे एकमेकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाले आहेत, या वादातून भाऊ भावाचा खून करतो त्यामुळे गुन्हेगारीला आपणच खरे दावेदार आहोत असे म्हणायला वावगे ठरू नये, गुन्हेगारीची खरी सुरुवात आपल्या घरापासून होते व ती पुढे जाऊन टोकाची भूमिका घेते, त्यामुळे पत्रकारांनी पत्रकारिता करीत असताना बातमीचा मजकूर, सार, विश्लेषण कशाप्रकारे करावा जेणेकरून आपल्या लिखाणातून समाज प्रबोधन होईल याकडे लक्ष दिले पाहिजे असे मला प्रामाणिकपणे वाटते, तसेच पत्रकारांनी पत्रकारिता करीत असताना निपक्षपाती करावी जेणेकरून आपली प्रतिमा समाजात उंचावेल असे या वेळी प्रमुख व्याख्याते दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ. किशोर पाटील यांनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले.
तसेच या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी
पत्रकार प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आपल्या महाविद्यालयाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात लौकिक करावे अशा मी शुभेच्छा देतो असेही त्यांनी शेवटी सांगितले. पत्रकार प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पत्रकार क्षेत्राकडे वळविण्यासाठी एक स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राज्यशास्त्र विभागाच्या व मास मिडिया विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे त्याचा विद्यार्थी वर्गाने फायदा करून घ्यावा व आपण मोठे पत्रकार कसे होऊ
शकतो याकडे लक्ष केंद्रित करावे असे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.रवींद्र रसाळ यांनी यावेळी प्रास्ताविक करताना सांगितले.
सदर पत्रकार प्रशिक्षण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मास मिडिया विभाग प्रमुख प्राध्यापिका सौ.प्रियांका ठाकूर यांनी केले तर आभार प्रदर्शन राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. एम्.एम्. देशपांडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!