क्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्र

मधुरा बँक्वेटहॉल जालना येथे– पाच लायन्स क्लब व तीन लिओ क्लब पदाधिकाऱ्यांचा शपथविधी समारंभ मा प्रांतपाल पुरुषोत्तमजी जयपुरियाच्या शुभहस्ते संपन्न.

Spread the love

मधुरा बँक्वेटहॉल जालना येथे– पाच लायन्स क्लब व तीन लिओ क्लब पदाधिकाऱ्यांचा शपथविधी समारंभ मा प्रांतपाल पुरुषोत्तमजी जयपुरियाच्या शुभहस्ते संपन्न.

या समारंभास तळेगावचे लेखक वक्ते डॉक्टर शाळीग्राम भंडारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

आवाज न्यूज :  तळेगाव दाभाडे, १० सप्टेंबर.

डी पी एम एस पी या जालना स्थित पाच लायन्स क्लब आणि तीन लिओ क्लबचा मधुरा बँक्वेट हॉल मध्ये शानदार शपथविधी समारंभ संपन्न. भारतीय संस्कृतीला अनुसरून दीप प्रज्वलनाने या पवित्र समारंभाची सुरुवात झाली.मीनाक्षी दाड यांनी नवीन सभासदांना शपथ दिल्यानंतर माजी प्रांतपाल ला विजयजी बागडिया संस्थापक अध्यक्ष ला सुभाषजी देविदान यांनी आपल्या मनोगतात मार्गदर्शना बरोबर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छाही दिल्या. झेड सी लायन संतोषकुमार दुधानी आणि इंद्रजीत केदारे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. माजी प्रांतपाल- अष्टपैलू अनुभव संपन्न व्यक्तिमत्व ला पुरुषोत्तमजी जयपुरिया यांनी भारतीय सणांचा आधार घेऊन या पदग्रहण समारंभाची सुरुवात केली.

अतिशय उत्साहवर्धक आणि तितक्याच अर्थपूर्ण वातावरणात या नऊ क्लबच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या हक्काची आणि कर्तव्याची जाणीव अतिशय समर्पक शब्दात उदाहरणासह ला पुरुषोत्तमजींनी दिली. त्यामुळे हा पदग्रहण समारंभ एका विशिष्ट उंचीवर जाऊन ९ पोहोचला. लायन सुनील बियाणीनी तळेगावहुन या समारंभाचे समारंभास प्रमुख पाहुणे ज्येष्ठ लेखक वक्ते ला डॉक्टर शालिग्राम भंडारी यांचा परिचय अतिशय समर्पक मोजक्या शब्दात सभागृहास करून दिला.

महामृत्युंजय मंत्राने ला डॉक्टर शालिग्राम भंडारी सरांनी सर्वप्रथम नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं. एखादी व्यक्ती जन्मल्यानंतर तिच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कसा होतो हे त्यांनी रिकाम्या ग्लासच उदाहरण देऊन स्पष्ट केलं. अशा विकसित व्यक्तींकडून तिचं योगदान टाईम टॅलेंट-ट्रेझर यातून ती व्यक्ती देऊ शकते- हे लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारींनी शेरोशायरी व काव्यपंक्तींचा आधार घेऊन स्पष्ट केले.

 

 

लायन राजेंद्र आणि लायन ललित यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. डॉक्टर भंडारींच्या स्वलिखित पुस्तकाची माहिती ला राधेश्याम भंडारीनी दिल्यामुळे पुस्तकातील विचारधन वेचण्यासाठी रसिक वाचकांची पुस्तक घेण्यासाठी झुंबड उडाली. तळेगाव क्लबचे ज्येष्ठ ला महेशभाई शहा या समारंभासाठी उपस्थित होते. आभार प्रदर्शनाने समारंभाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!