ताज्या घडामोडी

शिराळा पश्र्चिम भागातील कुंभारवाडयात गणेश मुर्तीकांरांची गणेश मूर्ती रंगरंगोटीची लगभग

Spread the love

कोकरुड/ प्रतिनिधी

गौरी गणपती उत्सव – काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शिराळा तालुक्यातील कोकरुड,बिळाशी, गवळेवाडी ,चरण, आरळा आदीं गावातील अनेक गणेशमूर्तीकार रंगरंगोटीचीचा अखेरचा हात गणेशमूर्तीस फिरवण्याची लगबग सुरू आहे. शिराळा पश्चिम भागातील बिळाशी सह सर्वच गावातील गावातील कुंभारवाड्यात मूर्ती बघण्यासाठी कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली आहे.यावर्षी कोरोनाचे संकट टळले असल्यामुळे गौरी गणपतीउत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याचे चित्र आहे.गवगावतील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांचे पदाधिकारी मंडप उभारणीच्या तयारीला लागले आहेत.लहान, मोठ्या आकर्षक गणेशमूर्ती बनवून विक्रीसाठी पश्चिम भागातील प्रमुख गावातील बाजारपेठा घरगुती गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या वस्तूंमुळे गजबजून गेल्या आहेत. शालेय विद्यार्थी, कुटुंबीय घरातील गणपती ठरविण्यासाठी कुंभारवाड्यात गर्दी करु लागले आहेत. बिळाशी येथिल कुंभारवाडयात पांडुरंग आर्ट्सचे मूर्तिकार आनंदा कुंभार, अभिजित कुंभार ,अमरदीप कुंभार,सौरभ कुंभार,भूषण कुंभार,सिद्धार्त कुंभार आदींसह गणेश मूर्तीकार गणेश मूर्तींवर रंगरंगोटी करताना शेवटचा हात फिरवताना दिसून येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!