ताज्या घडामोडी

रमेश गिरासे यांचा आदर्श पुरस्काराने गौरव

Spread the love

प्रमोद पाटील
पालघर जिल्हा प्रतिनिधी
अणुशक्ती मराठी शिक्षण संस्था संचलित डॉ. होमी भाभा विद्यालय तारापूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.

अमृत महोत्सवी वर्षात अणुशक्ती मराठी शिक्षण संस्था संचलित डॉक्टर होमी भाभा विद्यालय तारापूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा दोन सत्रात संपन्न झाला. याप्रसंगी विद्यालयातील उपक्रमशील जेष्ठ शिक्षक रमेश हिलाल गिरासे यांना संस्थेचे माजी सचिव व अध्यक्ष कै. कमलाकर विठ्ठल तळीखेडे यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आलेला आदर्श शिक्षक पुरस्कार स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तारापूर येथील तारापूर महाराष्ट्रचे स्थळ निदेशक अनिल देशमुख यांच्या शुभ हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी अनुशक्ती मराठी शिक्षण संस्थेचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय मूलकलवार, संस्थेचे उपाध्यक्ष सुरेशकुमार घाडगे, सचिव जयवंत राऊळ, सहसचिव स्वानंद मुळे, खजिनदार देवेंदें चुरी, सुरेंद्र घाग, विवेक वाळंजकर, सुशील पाटिल, संतोष लांडगावकर, विद्यालय मुख्याध्यापिका उमा गोखले, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी वृंद, पारितोषिक दाते, शिष्यवृत्ती दाते, देणगीदार, सर्व आजी-माजी विद्यार्थी, पालक वर्ग व प्रेक्षक वर्ग मोठ्या संखेने उपस्थित होते.

वार्षिक स्नेहसंमेलनात विविधरंगी सांस्कृतिक कार्यक्रम, विज्ञान, रांगोळी, हस्तकला व चित्रकला इत्यादी प्रदर्शन भरवण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!