ताज्या घडामोडी

भुस्खलनाचा धोका असलेल्या गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे: मनसे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत

Spread the love

कोकरुड/ वार्ताहर
शिराळा तालुक्यांतील मिरूखेवाडी ,डफळेवाडी, कोकणेवाडी, भाष्टेवाडी , धामणकरवाडी या गावांना दरडी कोसळण्याचा संभाव्य धोका आहे.त्या गावांतील लोकांचे अनत्र पुनर्वसन करावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सांगली जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत यांनी केले.ते करुंगली ता.शिराळा येथिल स्थलांतरीत करण्यात आलेल्या नागरिकांच्या भेटी प्रसंगी बोलत होते. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव आशिष कोरी , जमिर सनदी , तालुका उपाध्यक्ष तानाजी करंजवडेकर उपस्थित होते. यावेळी बोलताना सावंत म्हणाले की, नागरिकांना प्रत्येक वर्षी अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागितलर्षी स्थानिक लोकांची तात्पुरत्या निवार्याची सोय केली होती . याहीवर्षीही प्रशासनाने त्यांचे स्थलांतर करून तात्पुरत्या निवासाची सोय केली आहे. गेली काही वर्षे नेहमीच पावसाळ्यात स्थानिक लोकांचे स्थलांतर करावे लागते . ऐन पावसाळ्यात स्थालांतर होत असल्याने शेतात पेरणीकरण्यासाठी अडचणी येतात तसेच जनावरांचेही हाल होत आहेत. पावसाळा नसताना उर्वरीत काळातही इतर जंगली श्वापदे – जनावरे यांचा स्थानिकांना त्रास होतो. या परीस्थितीतून कायम स्वरूपी तोडगा निघावा अशी स्थानिकांची भावना आहे . या सर्वांचे अन्यत्र पुनर्वसन करावे तेथे त्यांना शासनामार्फत शेतजमिन आणि घरे द्यावीत. जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत शेजारीलच सुरक्षित ठीकाणी निवारा केंद्र उभे करावे. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने यावेळी करण्यात आली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!