ताज्या घडामोडी

सांगलीतील नवेखेडच्या गर्भवती महिलेने भिडविले सूर्यग्रहणाशी डोळे, अनिष्ठ प्रथेला दिली मूठमाती.

Spread the love

सांगली : नवेखेड (ता.वाळवा) येथील चार महिन्यांची गर्भवती असणाऱ्या सावित्रीच्या लेकीने अंधश्रद्धेत अडकलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी आज ग्रहणाशी डोळे भिडवले आणि अंधश्रद्धेला छेद देण्याचे धाडस दाखवले.
नवेखेड येथील पूजा ऋषीराज जाधव व ऋषिराज मोहन जाधव या उच्चशिक्षित जोडप्याने पुढाकार घेऊन समाजातील ग्रहण न पाहण्याच्या अनिष्ठ प्रथेला मंगळवारी मूठमाती दिली व समाजासमोर आदर्श ठेवला. पूजा जाधव या चार महिन्यांच्या गर्भवती आहेत. ग्रहण काळात भाजी चिरणें, फळे तोडने, अन्न ग्रहण करणे, मांडीवर मांडी घालून बसने वर्ज असते मात्र हे सर्व करून पूजा जाधव यांनी सोलर चष्म्यातून थेट ग्रहणात काळवंडलेल्या सूर्याशी डोळेही भिडवले. त्यांच्या या धाडसाला घरातील सर्व कुटुंबाचे सहकार्य लाभले.
पूजा जाधव यांच्या आजलसासू शांताबाई जाधव, सासू माजी सरपंच छाया जाधव, सासरे मोहन जाधव, दीर पंकज जाधव, जाऊ प्रियांका जाधव यांची साथ लाभली.दरम्यान ग्रहण काळात जे करायचे नाही, ते करून दाखवत आदर्श निर्माण केला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!